Full Width(True/False)

लादेनच्या घरी मिळाल्या होत्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट

मुंबई- बॉलिवूडच्या गाण्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या लोकप्रिय गायिका यांचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. ९० च्या दशकात बॉलिवूडमधील प्रत्येक गायक त्यांच्यासोबत गाण्यासाठी उत्सुक असायचा. अलका यांनी त्यांच्या सुरेल गायनाने श्रोत्यांना वेड लावलं. त्यांनी त्यांच्या संगीत क्षेत्रामधील करिअरमध्ये १ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. ९० च्या दशकात एखादाच असा चित्रपट असेल ज्यात त्यांचं गाणं नसेल. त्यांच्या आवाजाचे आजही लाखो लोक चाहते आहेत. अजूनही अलका यांची गाणी चाहत्यांच्या ओठांंवर असतात. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी गायलेली अनेक गाणी सुपरहिट ठरली. आजपर्यंत त्यांना ३६ वेळा उत्कृष्ट गायिकेच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. यावरून त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधला जाऊ शकतो. सामान्य प्रेक्षकच नाही तर ओसामा बिन लादेनही अलकाजींचा चाहता होता. अमेरिकेतील पोलीस पथकाने या गोष्टीचा खुलासा केला होता. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी अमेरिकेने एक गुप्त योजना आखली होती. त्यानुसार अमेरिकन सैनिकांनी ओसामाला त्याच्या पाकिस्तानमधील घरात घुसून मारलं होतं. तेव्हा त्याच्या घरात इतर वस्तूंचा शोध घेतला गेला. त्या दरम्यान ओसामाच्या घरातून अलका यांच्या गाण्यांच्या खूप जास्त कॅसेट मिळाल्या होत्या. त्यावरून इतर देशांवर दहशतवादी हल्ले करणारा ओसामादेखील अलका यांचा चाहता असल्याचं समोर आलं होतं. अलका यांचा जन्म २० मार्च १९६६ रोजी एका गुजराती कुटुंबात झाला. त्यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी आकाशवाणीसाठी गाणं गायलं होतं. त्यानंतर वयाच्या १० व्या वर्षी त्या मुंबईत आल्या आणि त्यांच्या गायिका होण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यांना खरी प्रसिद्धी 'तेजाब' चित्रपटातील 'एक दो तीन' या गाण्याने मिळाली. त्यांच्या चाहत्यांची संख्या वाढू लागली. त्यांची तुलना लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासोबत होऊ लागली होती. अलका यांनी गायलेल्या 'चोली के पीछे' गाण्यावरून चाहत्यांनी त्यांना वाईट गाणी न गाण्याचा सल्ला दिला होता. तर काहींनी त्यांच्या गाण्याच्या कॅसेटही जाळल्या होत्या. या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tFpGnI