मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक यांचा हा चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या ३० जुलैला रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. ज्यात आलियाच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळाली. पण त्यानंतर मात्र हा चित्रपट दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच कामाठीपुरा येथील एका संघटनेनं या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केल्यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेतूनही या चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला असून विधानसभेत त्यांनी या चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. या चित्रपटाच्या नावामुळे काठियावाडी शहराचं प्रतिमा मलीन होईल असं अमीन पटेल यांचं म्हणणं आहे. काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी सोमवारी विधानसभेत बोलताना सांगितलं, काठियावाडी शहर आता तसं राहिलेलं नाही जसं ते ५० दशकांपूर्वी होतं. या शहरातील महिला आता अनेक कामं करतात आणि त्या सर्व आता आपापल्या क्षेत्रांत पुढे गेल्या आहेत. पटेल यांनी राज्य सरकारला यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट हुसैन जैदी यांचं पुस्तक 'माफिया क्वीन ऑफ मुंबई' यावर आधारित आहे. या पुस्तकात गंगूबाई काठियावाडी यांची जीवन कथा मांडण्यात आली आहे. या चित्रपटातील मुख्य ठिकाण हे मुंबईतील कामाठीपुरा आहे. ज्या ठिकाणी ६० दशकांमध्ये गंगूबाई नावाच्या एका महिलेचा खूप मोठा प्रभाव होता. गंगूबाई कामाठीपुरामध्ये कोठा चालवत असत आणि त्यांचे अंडरवर्ल्डशी सुद्धा संबंध होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी या चित्रपटाला मुंबईतील कामाठीपुरा येथील लोकांनी विरोध केला होता. कामाठीपुरा मुंबईतील सर्वात मोठा रेड लाइट भाग आहे. या चित्रपटातून कामाठीपुरा भागाची प्रतिमा मलीन केली जात आहे. तसेच या भागाची परिस्थिती आता बदलत असून अशात या चित्रपटामुळे इथल्या पुढच्या काही पिढ्याचं भविष्य धोक्यात येणार असल्याचं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. आलिया भट्टनं या चित्रपटात 'गंगूबाई'ची भूमिका साकारली आहे. ज्या लग्न करून नवऱ्यासोबत गुजरातच्या काठियावाडीमधून मुंबईत येतात. त्या एका सधन कुटुंबात लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या. त्यांनी आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन वडिलांच्या अकाउंटन्टशी लग्न केलं होतं. पण लग्नानंतर जेव्हा त्या पतीसोबत मुंबईत आल्या तेव्हा त्यांच्या पतीनं त्यांनी अवघ्या ५०० रुपयांसाठी कामाठीपुरा येथील एका कोठ्यावर विकलं. ज्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्नही झाला होता. हा चित्रपट गंगूबाई यांचा संघर्ष आणि अंडरवर्ल्डमधील त्यांचा धाक यावर आधारित आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30pWMLT