Full Width(True/False)

...म्हणून जेनेलिया आणि रितेश यांनी मानले महाराष्ट्र सरकारचे आभार

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया आणि अभिनेता रितेश देशमूख यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहे. दोघांनीही या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आज विधीमंडळात राज्याचे अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प सादर केला.अर्थसंकल्पात रस्ते आणि दळवळणासाठी मोठ्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. तसंच '' मार्गाला दिवंगत माजी मुख्यमंत्री यांचे नाव देण्यात येईल अशी घोषणाही अजित पवार यांनी केली. त्यानंतर जेनेलिया आणि रितेश यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. दक्षिण मुंबईतून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जाण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा ईस्टर्न फ्री वे या मार्गास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग, बंदरे तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली गेल्या वर्षी पत्राद्वारे केली होती. मुंबईची वाहतूककोंडी लक्षात घेत महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई पूर्व उपनगर यांना जोडणाऱ्या ईस्टर्न फ्री वेची संकल्पना मांडली होती. विलासराव देशमुख यांच्यामुळेच हा मार्ग तयार होऊ शकला. या फ्री-वेची लांबी १६.८ किमी असून दक्षिण मुंबईतील पी डीमोलो रोडपासून ते चेंबूर येथील पूर्व द्रुतगती मार्गास हा मार्ग जोडतो. सध्या हा रस्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. या रस्त्यास माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव द्यावे, असं अस्लम शेख यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30oCfaA