Full Width(True/False)

OPPO ची नवीन फिटनेस बँड भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः ओप्पो कंपनीने भारतात Oppo F19 Pro+ आणि Oppo F19 Pro ला सोमवारी लाँच केले आहे. तसेच कंपनीने फिटनेस ट्रॅकरला आणले आहे. याला १२ वर्कआउट मोड्स, ब्लड ऑक्सीजन सेन्सर आणि रियल टाइम हार्ट रेट मॉनिटर सारखे फीचर्स सोबत बाजारात उतरवले आहे. वाचाः Oppo Band Style ची किंमत भारतात २ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. ८ मार्च ते २३ मार्च दरम्यान याला २ हजार ७९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते. याची विक्री फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि ऑफलाइन स्टोर्सवरून खरेदी साठी उपलब्ध करण्यात आले आहे. या बँडसाठी तुम्हाला अनेक स्ट्रॅप कलर्स मिळणार आहेत. या फिटनेस बँडमध्ये २.५डी कर्व्ड ग्लास प्रोटेक्शन सोबत १.१ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. सोबत थ्री अॅक्सेस एक्सलेरोमीटर, ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर आणि एसपीओटू सेन्सर दिला आहे. या रिस्टबँड मध्ये युजर्संना ब्लड ऑक्सिजन, हार्ट रेट फीचर मिळणार आहे. वाचाः सोबत ओप्पोने यात डेली अॅक्टिविटी ट्रॅकर, गेट अप रिमाइंडर्स आणि ब्रिदिंग एक्सरसाइज सारखे फीचर्स दिले आहेत. वर्कआउट ट्रेनिंग साठी यात वर्कआउट मोड्स दिले आहेत. यात एक खास फॅट बर्न मोड फीचर्स दिले आहे. हे ५ एटीएम रेसिस्टेंट आहे. फिटनेस फोकस्ड फीचर्स शिवाय या बँडमध्ये कॉल्स आणि मेसेज साठी अलर्ट्स दिले आहेत. तसेच, स्मार्टफोन्स सोबत कनेक्ट झाल्यानतर म्यूझिक प्ले बॅक ला कंट्रोल केले जाऊ शकतात. युजर्संला यासाठी ४० हून जास्त फेसेस मिळणार आहेत. या बँडच्या कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ व्ही५.० चे सपोर्ट दिले आहे. अँड्रॉयड ६.० आणि त्यापेक्षा वरच्या डिव्हाइस सोबत कंपिटिबल आहे. या फिटनेस ट्रॅकरची बॅटरी १०० एमएएच क्षमतेची आहे. सिंगल चार्जमध्ये ही १२ दिवस चालते, असा कंपनीचा दावा आहे. चार्ज करण्यासाठी याला दीड तास लागतो. Oppo Band Style चे खास फीचर्स •1.1 inch AMOLED Display •Heart Rate monitor •SpO2 Monitor •12 Sports Mode •Bluetooth 5.0 •5ATM Water Resistant •100 mAh battery •Notification Alert •Price:- ₹2,999 *Special Price :- ₹2,799 वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30nxbTX