Full Width(True/False)

ट्विटरवर Undo Send बटन मिळणार, ट्विटला पुन्हा एडिट करू शकणार

नवी दिल्लीः सोशल मीडियावरून देशात सध्या वादांची ठिणगी उडत आहे. त्यामुळे ट्विटर लवकरच अनडू बटन आणणार आहे. अॅपचे रिसर्चर जेन मानचून वोंग यांनी सांगितले की, अनडू सेंड बटनवर सध्या काम सुरू करण्यात आले आहे. या बटनच्या मदतीने आपल्याकडून झालेल्या चुका दुरूस्त करता येऊ शकणार आहे. या नवीन फीचरच्या नंतर युजर्संला ट्विटला एडिट करण्याचा ऑप्शन मिळणार आहे. युजर्सकडे अनडू करण्यासाठी काही सेकंद मिळणार आहे. द वर्जच्या रिपोर्टनुसार, अनडू बटनवर क्लिक करण्यासाठी एक पर्याय मिळणार आहे. ज्यावर तुम्ही कोणताही मेसेज पाठवल्यानंतर काही वेळेच्या आधी त्याला अनडू करू शकता. वाचाः असे करणार काम ट्विटरचे अनडू सेंड बटन या बटनच्या मदतीने युजर कोणत्याही ट्विटचे एडिट करू शकतील. यासाठी त्याला एक मर्यादीत वेळ मिळणार आहे. युजर कोणताही ट्विट करण्यासाठी सेंड बटनवर क्लिक करून तर त्या टाइमर सोबत Undo Send बटन स्क्रीन वर दिसेल. जर युजरला ट्विटा एडिट करू इच्छित असेल तर त्या बटनवर क्लिक करावे लागेल. जर Undo Send ची वेळ संपली असेल तर ट्विटला एडिट करता येऊ शकणार नाही. अनडू सेंड साठी किती वेळ युजर्संना मिळणार आहे, हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. वाचाः गेल्यावर्षापासून सुरू झाली बटनची चर्चा गेल्यावर्षीपासून ट्विटरने आपली पेड मेंबरशीप सर्विस साठी काम सुरू करणे सुरू केले होते. युजर्संना अनडू बटन सारखे पर्याय दिले जाणार आहेत. ट्विटरने सर्व लवकर अँड्रॉयड आणि आयओएस दोन्ही वर स्पेस बनवण्यासाठी आणि होस्ट करण्यासाठी क्षमता देण्यासाठी काम करीत आहे. वाचाः जीमेल मध्येही अनडूचे ऑप्शन उपलब्ध जीमेलवर ज्यावेळी कोणी ईमेल सेंड करीत आहे. अशावेळी हे ऑप्शन मिळते. ज्यावेळी ईमेलवरून मेल सेंड करीत असाल असावेळी बॉटम लेफ्ट खालील बाजुस दिले जाते. हे स्क्रीन जवळपास ३ सेकंद पर्यंत राहते. ज्यावेळी तुम्ही अनडू वर क्लिक करता त्यानंतर मेल रिओपन होतो. त्यानंतर त्यात एडिट करता येऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38fqAPP