मुंबई: करोनामुळे पुन्हा एकदा सर्वांनाच घरात बसावं लागलं आहे. कामासाठी जेमतेम जाता येत असताना भटकंतीचा विचारही मनात येणं अशक्य. पण, कलाकारांची बातच वेगळी.बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी अनेकजण पर्यटनाचा आनंद लुटताना दिसताहेत. बी-टाऊनचे अनेक कलाकारांनी व्हेकेशन मोड ऑन असं म्हणत मध्य-पूर्वेकडील देश, गोवा तसंच मालदीवला जाऊ लागलेत. अशा कलाकारांना प्रसिद्ध लेखिका यांनी दोन दिवसांपूर्वी चांगलंच सुनावलं होतं. आता अभिनेत्री देखील नाराजी व्यक्ती केली आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत श्रुतीनं देशातील वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली हे. तसंच जे बॉलिवूड सेलिब्रिटी आणि इतर ठिकाण सुट्ट्यांसाठी जात आहेत, त्यांच्यावर तिने टीका केली आहे. 'मी कोणालाही जज नाही करत आहे. परंतु देशात करोनामुळे अशी गंभीर परिस्थिती असताना परदेशात सुट्ट्या घालवण्यासाठी जाणं हे सर्व असंवेदनशील आहे', असं श्रुतीनं म्हटलं आहे.श्रुती पुढे म्हणाली की, 'मला असं वाटतं की, तुम्ही सेलिब्रिटी आहात, यासाठी तुम्ही लोकांचे, चाहत्यांचे आभार मानायला हवेत, तुमच्याकडे असलेल्या जास्तीच्या सुविधांचे असे प्रदर्शन किंवा दिखावा करणं योग्य नाहीए.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32ApYRA