Full Width(True/False)

हिना खानचा पाठलाग करणाऱ्या फोटोग्राफर्सवर भडकले सेलिब्रेटी

मुंबई: अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचं नुकतंच कार्डियक अरेस्टने निधन झालं. यावेळी हिना काश्मीरमध्ये शूटिंग करत होती. वडिलांच्या निधनाची बातमी मिळताच ती लगेचच मुंबईला परतली. पण जेव्हा ती मुबंई एअरपोर्टवर पोहोचली त्यावेळी तिला काही फोटोग्राफर्सनी अडवलं. त्यावेळी हिना त्यांना शांतपणे मला जाऊ द्या असं सांगताना दिसली पण तिचं म्हणणं ऐकलं नाही आणि ते तिच्या मागेमागे जातच राहिले. जेव्हा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा टीव्ही सेलिब्रेटींनी यावर नाराजी व्यक्त करत या फोटोग्राफर्सवर टीका केली आहे. मुंबई एअरपोर्टवरून बाहेर पडत असतानाच काही फोटोग्राफर्सनी हिना नकार देत असतानाही तिचा पाठलाग करत फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या असंवेदनशील वागवण्यावर अभिनेत्री हिमांशी खुराना आणि विकास गुप्ता यांनी टीका केली आहे. हिना खान आणि फोटोग्राफर्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. विकास गुप्तानं या फोटोग्राफर्सवर टीका करताना आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'कुणीतरी आपले वडील गमावलेत आणि तुम्हाला विनंती करत आहे की, त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे जाऊ द्या. असं असतानाही कोणी सतत ओरडत आहे की चेहऱ्यावर लाइट मारा आणि त्याला कोणताच फोटोग्राफर अडवत सुद्धा नाहिये. हिना तरीही नम्रपणे वागली पण तिच्याप्रती फोटोग्राफर्सनी दाखवलेली ही असंवेदनशील पाहून खूप दुःख होत आहे. रेस्ट इन पीस अंकल.' अभिनेत्री हिमांशी खुरानानंही फोटोग्राफर्सच्या या वागण्यावर राग व्यक्त केला आहे. तिनं हा व्हिडीओ रिट्विट करताना लिहिलं, 'हे पाहून खूप दुःख झालं. हे फोटोग्राफर्स किती असंवेदनशील आहेत. जेव्हा कोणतीरी त्यांचे वडील गमावले आहेत अशा वेळी थोडी संवदेनशीलता दाखवणं अपेक्षित असतं. हिना खूपच शांतपणे सांगताना दिसतेय की तिला जाऊ द्यावं पण तरीही फोटोग्राफर्सना फक्त कॉन्टेन्ट हवा आहे. हे खुपच लाजिरवाणं आहे.' हिना खान आणि तिच्या वडिलांमध्ये खूपच चांगलं बॉन्डिंग होतं. तिचा प्रत्येक गोष्टीत तिचे बाबा तिच्या सोबत असलेले पाहायला मिळायचे. जेव्हा हिना पहिल्यांदा मुंबईमध्ये आली होती तेव्हा केवळ तिच्या बाबांना माहीत होत की, ती या ठिकाणी अभिनय करण्यासाठी आली आहे. लॉकडाऊन २०२० मध्येही हिनानं तिच्या बाबांचे अनेक मजेदार व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QnKj9Y