मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीचा निर्माता आणि दिग्दर्शक आर्थिक अडचणींमध्ये अडकल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने ‘नेटफ्लिक्स’साठी 'सर्चिंग फॉर शीला' आणि सिनेमा 'अजीब दास्तान्स' या कलाकृती तयार केल्या आहेत. परंतु या दोन्ही कलाकृतींच्या गुणवत्तेमुळे आणि इतर काही कारणांमुळे सिनेमांची निर्मिती करणा-या लाइका प्रॉडक्शनने धर्मा प्रॉडक्शनबरोबर झालेल्या करारावर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे करण जोहर दिग्दर्शन करत असलेल्या त्याचा महत्त्वाकांक्षी सिनेमा 'तख्त'वर याचा थेट परिणाम झाला असून या सिनेमात पैसा गुंतवण्यासाठी लाइका प्रॉडक्शनने हात आखडता घेतला आहे. लंडन येथील मोबाईल कंपनी असलेल्या लाइकाने मनोरंजन क्षेत्रात उतरत लाइका प्रॉडक्शन कंपनी सुरू केली. परंतु सध्या याच कंपनीची आर्थिक अवस्था फारशी चांगली नसल्याचेही वृत्त आहे. या कंपनीचे दिग्दर्शक शंकर यांच्याबरोबर कमल हसन यांनी १९९६ मध्ये 'इंडियन' या सिनेमाच्या रिमेकची घोषणा केली होती. गेल्या वर्षी या सिनेमाच्या सेटवर दुर्घटना झाली आणि त्यात तीन लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर या सिनेमाचे चित्रिकरण बंद केले. त्यानंतर करोनामुळे देशात लॉकडाऊन लागला. या सिनेमात काम करणा-या कलाकारांना लॉकडाऊन संपल्यानंतर काम सुरू केले जाईल असा विश्वास होता. परंतु दिग्दर्शक शंकरने या सिनेमाचे काम सुरू न करता राम चरणबरोबर सिनेमा करत असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर त्याचा सिनेमा 'अन्नियन' चा रिमेक अभिनेता रणवीर सिंहबरोबर करत असल्याची घोषणा केली. या नवीन सिनेमांची घोषणा करण्यामागे लाइक प्रॉडक्शन कंपनीसमोरील आर्थिक संकट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत दिग्दर्शक शंकर यांनी सांगितले की, त्यांनी नवीन सिनेमांची घोषणा त्यांच्या नियोजनानुसारच केली आहे. तसेच 'इंडियन २' हा सिनेमा मध्येच सोडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. लाइका प्रॉडक्शनने अलिकडेच अनेक हिंदी सिनेमांमध्ये पैसे गुंतवणार असल्याची घोषणा केली होती, परंतु मोठे प्रोजेक्ट असलेल्या दक्षिणात्य सिनेमांमध्ये त्यांचे बरेचसे पैसे अडकले आहेत. त्यामुळे लाइका कंपनीला करण जोहरचा 'तख्त' या महत्त्वाकांक्षी सिनेमामध्ये पैसे गुंतवणे सध्या तरी शक्य नाही. लाइका प्रॉडक्शन दोन हिंदी सिनेमांच्या निर्मितीमध्ये सहभागी आहेत. हे दोन्ही सिनेमे निर्मितीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहेत. यातील एका सिनेमा निर्माता आनंद एल राय यांची कंपनीसोबत केला जात असून त्यामध्ये जान्हवी कपूर काम करत आहे. तर 'गुड लक जेरी' या सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ सेनगुप्ता करत असून या सिनेमाचे बजेट खूप कमी असल्याचे सांगितले जात आहे. अक्षयकुमारचा 'रामसेतु' या सिनेमाच्या निर्मितीमध्येही लाइका कंपनीचा सहभाग आहे. या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली होती, परंतु त्यानंतर लगेचच अक्षयकुमारला करोनाची लागण झाल्यामुळे हे काम थांबवाले लागले आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि मुंबईत चित्रिकरणावर काही दिवसांची बंदी घातल्याने हे काम अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान, शनिवारी लाइका कंपनीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करता करण जोहरसोबत कंपनीने जो करार केला आहे तो देखील अडचणीत आला आहे. करोनाच्या दुस-या लाटेमुळे आणि यामुळे होणारे आर्थिक नुकसान यामुळे कंपनीने त्यांच्या धोरणांवर पुनर्विचार करत त्यात काही बदल करण्याचे ठरवले आहे. दरम्यान, धर्मा प्रॉडक्शनची सहकंपनी धर्माटिकनेही ज्या पद्धतीने 'सर्चिंग फॉर शीला' आणि 'अजिब दास्तान्स' चे निर्मिती केली आहे, त्यामुळे देखील त्यांच्या ब्रँडचे नुकसान झाले आहे. आता बाजारातून पैसे घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. इतकेच नाही तर करण जोहर त्याच्या कंपनीचे काही हिस्सा विकण्याच्याही तयारीत आहे. परंतु त्यामध्ये त्याला अद्याप यश आलेले नाही. अर्थात याबाबत धर्मा प्रॉडक्शन अथवा लाइका प्रॉडक्शनने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QmqNLn