Full Width(True/False)

प्रियांका च्रोप्रानं आणि नव्या नवेलीनं झारखंडच्या लेकीचं केलं कौतुक; ही आहे तरी कोण?

मुंबई : झारखंडमधील एका अशिक्षित आई-वडिलांच्या मुलीची सध्या देशामध्ये खूपच चर्चा आहे. सीमा असे या मुलीचे नाव असून तिची हुशारी पाहून केंब्रिजमधील हार्वड युनिव्हर्सिटीने स्कॉलरशिप दिली आहे. तिने मिळवलेल्या या यशाबद्द अभिनेत्री आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीने तिचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक केले आहे. सीमा झारखंडमधील ओरमांडी या छोट्याशा खेड्यात रहाते. सीमाची घरची गरीबी असून तिचे आई-वडिल अशिक्षित आहेत. तिचे वडील शेतात काम करतात आणि त्याचबरोबर चरितार्थ चालवण्यासाठी एका धाग्याच्या कारखान्यातही काम करतात. सीमाने २०१२ मध्ये युवा फुटबॉल संघातून खेळायला सुरुवात केली. खेळण्यामुळे बाहेरच्या जगाततील घडामोडी तिला समजत असल्याने तिने बालविवाह करण्यास नकार दिला. इतकेच नाही तर आपल्याला पुढे शिकायचे असल्याचे ठामपणे सगळ्यांना सांगितले. त्याप्रमाणे तिने शिकणे आणि खेळणे हे दोन्ही सुरू ठेवले. हे तिच्यासाठी सोपे नव्हते. फूटबॉल खेळताना तिला शॉर्ट पॅण्ट घालावी लागायची. यावरूनही तिच्यावर टीका करण्यात आली होती. परंतु या सगळ्याकडे तिने दुर्लक्ष केले. खेळणे आणि शिकणे तिने नेटाने सुरू ठेवले. विद्यापीठात जाणारी सीमा ही तिच्या कुटुंबातील पहिली मुलगी आहे. इतकेच नाही तर युवा इंडिया या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार सीमाने हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधील प्रवेश परीक्षा दिली. ही प्रवेश परीक्षा अतिशय कठीण होती तरी देखील सीमाने त्यात बाजी मारली आणि तिला येथे स्कॉलरशिप आणि अॅडमिशन मिळाली आहे. दरम्यान, युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन नेमके काय शिकणार हे सीमाने अजून ठरवलेले नाही. मात्र, तिचे ध्येय ठरलेले आहे, त्याबाबत तिने सांगितले,'मला माझ्या गावात आणि संपूर्ण देशात लैंगिक समानता आणायची आहे. लैंगिक भेदभाव, घरगुती हिंसाचार, बालविवाह या गोष्टींना आळा घालायचा आहे. त्यासाठी सर्वात आधी लैंगिक समानता आणणे अतिशय आवश्यक आहे. माझ्या गावातील महिलांसाठी मी एक संस्था सुरू करण्याचा विचार आहे,' असे सीमाने सांगितले. सीमाने मिळवलेल्या या यशाबद्दल आंतरराष्ट्रीय अभिनेत्री प्रियांका चोप्राने शुक्रवारी ट्विट करुन केंब्रिजमधील हार्वर्ड विद्यापीठाची स्कॉलरशिपबद्दल सीमाचे भरभरून कौतुक केले आहे. प्रियांका म्हणाली, “मुलीला शिक्षित करा आणि ती जग बदलू शकते..किती प्रेरणादायक कामगिरी..मस्तच सीमा.. तू पुढे काय करतेस ते पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. एवढेच नाही तर अमिताभ बच्चन यांची नात नंदा हिने देखील सीमाचे कौतुक केले आहे. नव्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. शिवाय तिच्या ‘प्रोजेक्ट नवेली’ या माध्यमातून ती स्त्री-पुरुष समानता निर्माण करण्यासाठी काम करत आहे. नव्याने देखील इन्स्टाग्रामवरील युवा इंडियाची पोस्ट तिच्या इन्स्टा स्टोरीला शेअर केली आहे. युवा इंडियाच्या या पोस्टमध्ये सीमाचे काही फोटो शेअर करण्यात आले असून तिचा खडतर प्रवास सांगत इतरांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32LzS2K