Full Width(True/False)

अभिनेता अंशुमन विचारेची मुलगी अन्वी काय सांगतेय ते एकदा ऐकाच

मुंबई : अभिनेता त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या मुलीचे अन्वीचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो आणि मजेशीर व्हिडीओ सातत्याने अपलोड करत असतो. त्याच्या या फोटोंना आणि व्हिडीओंवर त्याचे चाहते भरभरून लाइक आणि कमेन्ट करत असतात. तसेच अन्वीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत असतात. अंशुमनप्रमाणेच अन्वीदेखील स्टार झाली आहे. अलिकडेच अंशुमनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अन्वीचा नवीन व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमधून चिमुरड्या अन्वीने सर्व लोकांना एक आवाहन केले आहे. अन्वीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. काय आहे हा व्हिडीओ या व्हिडीओमध्ये अन्वी, तिची आई आणि बाबांबरोबर घरात आहे. अन्वी घरातच इकडून तिकडे फेऱ्या मारत आहे. यावर अन्वीची आई तिला विचारते, 'तू काय करतेस गं..', त्यावर अन्वी म्हणते 'मी घरातच फेऱ्या मारत आहे. घरात बसून बसून पाय दुखतं आहेत ना माझे...' यावर अन्वीची आई तिला विचारते, 'मग बाहेर जाऊन का नाही फेऱ्या मारत...' त्यावर चिमुरडी अन्वी सांगते, ' अगं बाहेर करोना आहे ना. म्हणून बाहेर जायचं नाही. बाहेर जर तुम्ही गेलात तर तुम्हांला पोलीस काका पकडतील.' चिमुरड्या अन्वीला जे कळतं ते मोठ्या लोकांना कळत नाही म्हणून अन्वी या व्हिडीओतून सगळ्यांना सांगते की, कुणीही बाहेर जाऊ नका घरातच बसा कारण बाहेर लॉकडाऊन आहे. अन्वीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप लोकांनी पाहिला आणि त्याला लाइकही केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aT8fJJ