मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने १९९२ सालच्या 'बलवान' चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने 'काटे', 'सपूत' आणि 'हेरा फेरी' चित्रपटातून स्वतःची ओळख निर्माण केली. याशिवाय 'धडकन' चित्रपटातून नकारात्मक भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांची मन जिंकली. परंतु, इतकं करूनही सुनील अक्षय कुमार, सलमान खान आणि अजय देवगन यांच्याप्रमाणे मोठ्या पडद्यावर राज्य करू शकला नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीलने त्याने केलेल्या चुका मान्य केल्या ज्यामुळे त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागली. सुनीलने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, 'एक होता जो काही वर्षांनंतर अयशस्वी ठरला अकारण तो वास्तविकतेवर विश्वास ठेवत होता. पण मार्केटिंगमध्ये मागे पडला. मी नेहमीच पडद्यावर एक नॉन- रोमॅन्टिक अभिनेता राहिलो. माझी अडचण ही नाही की मी एकाच प्रकारचे चित्रपट करत राहिलो. मी नेहमी सेफमध्ये राहण्याचा प्रयत्न केला. मी कधीही वेगळे चित्रपट करण्याच्या प्रयत्न केला नाही. तुम्ही जर एकाच बॅनरसोबत काम करत राहिलात तर त्याचा अर्थ होतो की तुमच्यात निर्णय घ्यायची क्षमता नाही. जर तुम्ही रिस्क घेत नाही तर तुम्ही अभिनेता नाही. तुम्हाला स्वतःची वेगळी स्टाइल बनवावी लागते.' यादरम्यान, अभिनेता टायगर श्रॉफ आणि आयुष्मान खुराना यांचं कौतुक करत सुनील म्हणाला, 'टायगर आणि आयुष्मानला बघा, त्यांनी त्यांचा रस्ता स्वतः निवडला. ते खूप चांगले अभिनेते आहेत. आम्ही सगळे सेल्फ- मेड आहोत. आम्ही काही चुका सुद्धा केल्या पण अजय आणि अक्षयचं नशीब तेव्हा जास्त चांगलं होतं. आज कोणीही सुनील शेट्टीवर ५० कोटी रुपयेही लावणार नाही पण अक्षय कुमारवर ५०० कोटीसुद्धा लावायला तयार होतील. मी माझ्या चुकांमधून शिकलोय आणि मी त्यांना सुधारायचा प्रयत्न करतोय. कदाचित मी जे काही शिकलो ते माझ्या मुलाला पुढे उपयोगी पडेल.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gBmJkO