Full Width(True/False)

एका नमस्कारासाठी मीना कुमारींनी धुडकावली होती सिनेमाची ऑफर

मुंबई- एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात ट्रॅजेडी क्वीन होत्या. आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या मीना कुमारी यांचं आयुष्य अनेक खाच- खळग्यांनी भरलेलं होतं. बालपणापासूनच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या जन्माच्या वेळी मीना कुमारी यांच्या आई- वडिलांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे त्यांनी मीना कुमारी यांना अनाथ आश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ते दोघे मीना कुमारी यांना आश्रमाच्या पायरीवर ठेवून आलेदेखील होते. परंतु, त्यांच्या वडिलांच्या मनाला ही गोष्ट फार लागली आणि ते परत जाऊन मीना कुमारी यांना घरी घेऊन आले. पैसे कमावण्यासाठी मीना कुमारी यांनी वयाच्या सातव्या वर्षापासूनच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्या वयातही मीना कुमारी आपल्या संपूर्ण कुटुंबाचा खर्च करत होत्या. मीना कुमारी त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीमुळे लहान वयातच मोठ्या झाल्या होत्या. त्यांनी सहाय्यक अभिनेत्री म्हणून 'सनम', 'तमाश' आणि 'लाल हवेली' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. १९५२ मध्ये आलेल्या 'बैजू बावरा' या चित्रपटाने मीना कुमारी यांना ओळख मिळवून दिली. या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. याच चित्रपटाच्या सेटवर एकेदिवशी त्यांची भेट दिग्दर्शक यांच्यासोबत झाली. त्यावेळेस मीना कुमारी यांनी कमालजींना नमस्कार केला. परंतु, कमाल यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. ही गोष्ट मीना कुमारी यांना फार लागली. काही काळानंतर मीना कुमारी यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की, कमालजी त्यांच्यासोबत एक चित्रपट बनवू इच्छित आहेत. हे ऐकून त्यांना त्या दिवसाची आठवण झाली आणि त्यांनी वडिलांना काम करायला नकार दिला. त्यावर वडिलांनी त्यांना समजावत म्हटलं, 'ते खूप मोठे दिग्दर्शक आहेत.' त्यावर मीना कुमारी म्हणाल्या, 'मोठे आहेत तर काय? जो माझ्या नमस्काराचं उत्तर नाही देऊ शकत मी त्याच्यासोबत काम का करू?' वडिलांनी समजावल्यावर मीना कुमारी यांनी तो चित्रपट करायला होकार दिला. परंतु, तो चित्रपट कधीही बनला नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xktPA5