Full Width(True/False)

मुंबई पोलिसांनी शेअर केला सलमानच्या 'राधे'चा मीम, ट्वीट चर्चेत

मुंबई: देशभरात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ज्यात मुंबईमधील रुग्णांची संख्या सर्वाधित आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी घरी राहून करोनाच्या नियमावलीचं पालन करायला हवं आणि कोविडच्या सर्व नियमांचं पालन केलं जाईल याकडे लक्ष देताना दिसत आहे. दरम्यान मुंबई पोलीस अनेकदा हटके अंदाजात नागरिकांना संदेश देत असतात. हा त्यांचा अंदाज लोकांच्या नेहमीच पसंतीस उतरतो. यासाठी ते बरेचवेळा चित्रपटांचे डायलॉग सुद्धा वापरताना दिसतात. नुकतंच मुंबई पोलिसांनी करोना काळात मास्कचं महत्त्व पटवून देण्यासाठी एक ट्वीट केलं आहे. ज्यात त्यांनी सलमान खानच्या चित्रपटातील एका सीनचा मीम शेअर करत मुंबईकरांना मास्कच्या जागरुकतेचा संदेश दिला आहे. मास्क वापरला नाही तर काय होईल हे त्यांनी या मीमच्या माध्यमातून सांगितलं आहे. या चित्रपटात एक सीन आहे ज्यात रणदीप हुड्डा आय लव्ह इट असं म्हणताना दिसतं. मुंबई पोलिसांनी रणदीपच्या चेहऱ्यावर करोनाचा फोटो चिकटवून हा मीम शेअर केला आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जर मास्क न लावता बाहेर गेलात तर तुम्ही कोविडची शिकार व्हाल.' मुंबई पोलिसांच्या या ट्वीटवर अनेक युझर्ससह सेलिब्रेटींनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मुंबई पोलिसांच्या या हटके ट्वीटचं कौतुक केलं आहे. सलमान खानच्या 'राधे'बद्दल बोलायचं तर या चित्रपटात सलमान खानसोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभूदेवानं केलं असून हा चित्रपट येत्या १३ मे ला थिएटरसोबतच Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही रिलीज होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dPIBHj