मुंबई : संपूर्ण सिनेविश्वाचे लक्ष लागलेला ९३ वा ऑस्कर सोहळा सोमवारी पार पडला. या सोहळ्यामध्ये देशा-परदेशात लोकप्रिय ठरलेल्या दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यामध्ये यांच्यासह भारताला पहिला ऑस्कर सन्मान मिळवून देणाऱ्या या दोन भारतीय कलाकारांचा आवर्जून समावेश केला होता. या कलाकारांना जागतिक पातळीवरील सन्मानाच्या असलेल्या पुरस्कार सोहळ्यात आदरांजली वाहिलेली पाहून प्रत्येक भारतीय सिनेरसिकांना गहिवरून आले. याशिवाय या कार्यक्रमात अन्य देशांतील कलाकारांनाही आदरांजली वाहण्यात आली. ऑस्कर सोहळ्यामध्ये इन मोमोरियम सेक्शनमध्ये हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये काम केलेल्या दिवंगत कलाकारांना आदरांजली वाहण्यात आली. यामध्ये भारतीय कलाकार इरफान खान यांचाही उल्लेख करण्यात आला. अभिनय क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल इरफान यांचे कौतुक करण्यात आले असून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. इरफान खान यांच्याशिवाय सिसली टायसन, ख्रिस्तोफर प्लमर, चॅडविक बोसमेन यांनाही आदरांजली वाहण्यात आली. इरफान खान यांनी २९ एप्रिल २०२० मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना न्युरोएंडोक्राइन ट्युमर झाला होता. त्यांच्यावर शर्थीचे उपचार करण्यात आले परंतु त्यातून ते वाचू शकले नाहीत. इरफान यांनी हिंदी सिनेजगतामध्ये अनेक हिट सिनेमे दिले. इतकेच नाही तर हॉलिवूडमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. ए माइटी हार्ट, स्लमडॉग मिलेनिअर, लाइफ ऑफ पाय, द अमेझिंग स्पायडर मॅन, ज्युरासिक वर्ल्ड अशा अनेक सिनेमांत इरफान यांनी काम केले होते. यावेळी इरफान खान यांच्यासोबत 'स्लमडॉग मिलेनियर' सिनेमात काम करणारी अभिनेत्री फ्रीडा पिंटोने अकादमी पुरस्कार सोहळ्यात एक नोट पाठवली. त्यात तिने लिहिले, 'इरफान खान यांच्यासारखा अभिनेता होणार नाही. एक कलाकार म्हणू त्यांची गुणवत्ता अनमोल आहे. ते एक असे कलाकार होते ज्यांनी मानवता दाखवली. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. माझ्या यापुढच्या करिअरमध्ये ते माझा आदर्श आहेत.' भानु अथैय्या यांनाही श्रद्धांजली ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय कलाकार म्हणून वेशभूषाकार भानू अथैय्या यांचे नाव आदराने घेतले जाते. भानू अथैय्या यांचेही १५ ऑक्टोबर २०२० मध्ये ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांनाही यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात आदरांजली वाहण्यात आली. भानू अथैय्या यांनी १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गांधी' सिनेमासाठी वेशभूषा केली होती. त्यासाठी त्यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यानंतर त्यांनी वेशभूषा केलेला 'लगान' या सिनेमासाठीही नामांकन मिळाले होते, परंतु थोडक्यात हा पुरस्कार हुकला. कोल्हापूरमध्ये जन्मलेल्या भानू अथैय्या यांनी १०० हून अधिक सिनेमांसाठी वेशभूषा केली होती. याशिवाय या कार्यक्रमात , मॅख्स वॉन सीडो, शॉन कॉनरी, डायना रिग, हेलेन मॅक्रॉरी यांसारख्या दिग्गज कलाकरांनाही आदरांजली वाहण्यात आली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aDGjcD