मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री काही दिवसांपूर्वीच मालदीवला सुट्ट्या घालवण्यासाठी गेली होती. तिथले काही फोटो जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केले होते. तर नुकताच जान्हवीचा सोबत व्यायाम करतानाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता जान्हवी भारतात परत आली आहे. नुकतंच तिला मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. घरी परतल्यावर जान्हवीने तिचे काही फोटो पोस्ट करत सोशल मीडियावर माफी मागितली आहे. जान्हवीने इन्स्टाग्रामवर तिचे निसर्गरम्य ठिकाणचे काही फोटो शेअर केले आहेत आणि माफी मागितली आहे. तिने ही पोस्ट वसुंधरा दिवसासाठी केली आहे. तिने या संपूर्ण पृथ्वीचे आभार मानत तिची माफी मागितली आहे. आम्ही तुझी काळजी घेत नाही त्यामुळे आम्हाला माफ कर असं तिने लिहिलं आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलं, 'तू आम्हाला इतकं दिलंस पण आम्ही तुला विसरून गेलो. त्या प्रत्येक सेकंदासाठी आम्हाला माफ कर जेव्हा आम्ही तुझ्याप्रती बेजबाबदार झालो. तू प्रत्येकवेळी आमची काळजी घेत राहिलीस आणि आम्ही मात्र तुला त्रास देत राहिलो. आम्ही तुझी काळजी घेऊ म्हणून तू वाट बघत राहिलीस पण आम्ही तुझी किंमत केली नाही. या सगळ्यासाठी आम्हाला माफ कर.' अशी पोस्ट करत तिने या संपूर्ण पृथ्वीची माफी मागितली. तिच्या या पोस्टवर चाहतेही तिचं कौतुक करत आहेत. लॉकडाउनपूर्वी जान्हवीचा 'रूही' सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर जान्हवी 'दोस्ताना २' आणि 'गुड लक जेरी' चित्रपटात झळकणार आहे. करोनाकाळात मालदीवला फिरायला गेल्यामुळे जान्हवीला देखील चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ndONMp
