नवी दिल्ली . करोना काळात स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबियांचे रक्षण करायचे असेल तर आपण कोविड -१९ रुग्णांच्या संपर्कात येण्याचे टाळणे आणि त्यांचा संपर्क कमी करणे सर्वाधिक महत्वाचे आहे. यासाठी Apple आणि गूगलने एकत्रितपणे तंत्रज्ञान विकसित केले आहे , जे वापरकर्त्यांना कोव्हिड -१९ एक्सपोजरसह संपर्क ट्रेससह सहज सजग करू शकते. ही एक्सपोजर नोटिफिकेशन सिस्टम एपीआय या दोन्ही टेक जायंटने जून २०२० मध्ये विकसित केले होती महत्वाचे म्हणजे, या अॅपने युनायटेड किंगडम (यूके) मध्ये उत्तम काम केले आहे. वाचा : या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तंत्रज्ञानामुळे युनायटेड किंगडममधील ४,२०० ते ८,७०० युजर्सचे जीव वाचविण्यात यश आले. पण दुर्दैवाची बाब म्हणजे यूके अॅपमध्ये वैशिष्ट्ये दिल्याप्रमाणे भारताकडे असे अॅप नाही. असा दावा अहवालात करण्यात आला आहे. संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार, कोविड ट्रेसिंग तंत्रज्ञान एनएचएस Appsशी सुसंगत आहे आणि एका अहवालानुसार, यामुळे ४,२००ते ८,७०० वापरकर्त्यांचे प्राण वाचले आहेत. या संशोधनात संशोधकांनी असे म्हटले आहे की, "आमच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की एनएचएस अॅपद्वारे सुमारे १००,००० ते ९०००,००० पर्यंतच्या तपशीलांच्या आधारे मोठ्या संख्येने कोविड -१९ केसेस टाळता आले. २०२० मध्ये लाँच केले गेले हे तंत्रज्ञान कोविड -१९ पीडित लोकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना आरोग्य अधिकाऱ्यांना ट्रेस करता यावे व संप्रर्क साधता यावा याकरिता जून २०२० मध्ये संपर्क ट्रेसिंग तंत्रज्ञान Google आणि Apple यांनी सुरू केले. ही एक्सपोजर नोटिफिकेशन कशी काम करते याबद्दल Google ने आपल्या ब्लॉगमध्ये सविस्तर सांगितले आहे . त्यात नमूद केले आहे की, “संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी संपर्क ट्रेसिंगच्या पारंपारिक पद्धती महत्त्वपूर्ण आहेत. हे तंत्रज्ञान आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत देऊ शकते. ज्यामुळे, ते कोविड -१९ रुग्णांच्या च्या संपर्कात येणार्या वापरकर्त्यांविषयी सहज माहिती देऊ शकतात. हे आपल्या स्मार्टफोनवरील एक्सपोजर नोटिफिकेशनपासून सुरू होते. आपण कोविड -१९ ला एक्स्पोज झाला असाल तर आरोग्य सेविकांना आपल्याशी संपर्क साधण्यास हे मदत करेल. अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये फीचर उपलब्ध एक्सपोजर नोटिफिकेशन फीचर अॅन्ड्रॉईड आणि आयफोनच्या सेटिंग मेनूमध्ये उपलब्ध आहे. परंतु, भारतात App सुरु केल्यावर सूचना येते कि , हे वैशिष्ट्य आपल्या क्षेत्रात उपलब्ध नाही. कारण आरोग्य अधिकाऱ्यांनी ते उपलब्ध करून दिले नाही. भारतात आरोग्य सेतु App आहे जो संपर्क ट्रेसिंग अॅप आहे परंतु सध्या लसीकरण स्लॉट बुक करण्यासाठी वापरला जात आहे. आरोग्य सेतु अॅपमध्ये गूगल-Apple एपीआय नाही आणि संपर्क ट्रेसिंगसाठी ते सुसंगत नाही. म्हणूनच भारतातील वापरकर्ते हे त्यांच्या फोनमध्ये वापरू शकत नाहीत. गुगल आणि Appleच्या या सेवेसाठी सरकारला गोपनीयतेशी निगडीत काही नियम स्वीकारावे लागतील. ब्लूटूथद्वारे रुग्णांचा शोध घेणे शक्य हे तंत्रज्ञान ब्ल्यूटूथचा वापर करून कॉन्टॅक्ट ट्रेस करते तर आरोग्य सेतु अॅप लोकेशन सारख्या फीचर्सचा उपयोग करते. मुळात, गूगल आणि Apple डेटा कलेक्ट करण्याच्या विरोधात आहेत आणि म्हणूनच ही एपीआय अनामिक डेटा संकलित करते आणि एक रँडम आयडी तयार करते जो संपर्क ट्रेसिंगबद्दल शोधण्यासाठी वापरला जातो. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33KpuZz