Full Width(True/False)

युट्यूबची मोठी घोषणा, आता शॉर्ट व्हिडीओ बनवा आणि कमवा भरपूर पैसे

नवी दिल्ली : लोकप्रिय व्हिडीओ प्लॅटफॉर्म युट्यूबवर दररोज हजारो व्हिडीओ अपलोड होत असतात. ओटीटी प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता वाढत असताना देखील युट्यूबने आपले स्थान कायम ठेवले आहे. आता कंपनीने १०० मिलियन डॉलर्स (जवळपास ७३५ कोटी रुपये) फंडची घोषणा केली आहे. कंपनी असे कंटेट क्रिएटर्ससाठी करत आहे. कंपनी या फंडमधून सर्वोत्तम क्रिएटर्सला व्ह्यूअरशिप आणि एंगेजमेंटच्या आधारावर प्रत्येक व्हिडीओसाठी पैसे देणार आहे. युट्यूबने फंडला सर्व व्हिडीओ मेकरसाठी खुले ठेवणार आहे. हा फंड २०२१ आणि २०२२ या वर्षात क्रिएटर्समध्ये वाटला जाणार आहे. वाचा : टिकटॉकचा वापर जगभरात वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत शॉर्ट्सकडे यूजर्सला आकर्षित करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे फेसबुकने टिकटॉकची कॉपी करत प्लॅटफॉर्म सुरू देखील केला आहे व व्हिडीओवर जाहिरात देखील दाखवत आहे. युट्यूब आपल्या प्लॅटफॉर्मला अजून सोपे बनवत आहे, जेणेकरून अनेकजण या प्लॅटफॉर्म्सशी जोडले जातील व व्हिडीओ तयार करतील. कंपनीने अनेक स्टार्सला देखील रिक्रूट केले आहे. टिकटॉकच्या यशानंतर स्मार्टफोनवर व्हिडीओ बनवणे सोपे आले आहे. युट्यूब आपल्या क्रिएटर्सला मोठ्या प्रमाणात फंड देत आहे. आधी युट्यूब आपल्या क्रिएटर्सला जास्त पैसे देत नसे, त्यामुळे यूजर्स टिकटॉक, आणि इंस्टाग्रामकडे वळले होते. वाचा : टिकटॉकची लोकप्रियता पाहताना युट्यूबने शॉर्ट्स नावाने प्लॅटफॉर्म आणला. आता कंपनीने जाहिरातीशिवाय क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग शोधला आहे. मार्चपर्यंत शॉर्ट्सला ६.५ बिलियन डेली व्ह्यूज मिळाले होते. दरम्यान, तुम्ही जर युट्यूब अ‍ॅपचा वापर करत असाल तर ट्रेंडिंग सेक्शनमध्ये अनेक छोटे व्हिडीओ दिसतील, जे यूजर्सने अपलोड केले आहेत. कंपनीने व्हिडीओ तयार करण्यासाठी शॉर्टस बटन देखील दिले आहे, ज्यामुळे कोणालाही सहज व्हिडीओ तयार करून अपलोड करता येईल. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tESoF3