Full Width(True/False)

स्वस्त किंमतीत बेस्ट फीचर्सचा सॅमसंगचा नवा फोन भारतात येतोय!

नवी दिल्लीः स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंग लवकरच भारतात आपला 4G स्मार्टफोनला लाँच करणार आहे. याचा खुलासा ब्लूटूथ SIG सर्टिफिकेशन साइटवर झाला आहे. सर्टिफिकेशन साइटवर या हँडसेटला SM-M325FV/DS मॉडल नंबर सोबत पाहिले गेले आहे. सर्टिफिकेशन साइट वरून मिळालेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy M32 4G स्मार्टफोनला खास फीचर्स सोबत लाँच करणार आहे. फोनमध्ये मोठी बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा पाहायला मिळू शकतो. या फोनला 4G फोन बजेट रेंज मध्ये लाँच केले जाऊ शकते. म्हणजेच या फोनची किंमत १० ते १५ हजार रुपये दरम्यान असू शकते. वाचाः Samsung Galaxy M32 4G चे संभावित फीचर्स मीडिया रिपोर्टनुसार, Samsung Galaxy M32 4G मध्ये Bluetooth 5.0 कनेक्टिविटी दिली जाऊ शकते. हा फोन ४ जी फोन लेटेस्ट अँड्रॉयड ११ ऑपरेटिंग सिस्टम सोबत येऊ शकतो. तसेच Samsung Galaxy M32 मध्ये ६.४ इंचाचा HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या अपकमिंग फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. वाचाः Samsung Galaxy M32 मध्ये प्रायमरी कॅमेरा म्हणून ४८ मेगापिक्सलचा दिला जाऊ शकतो. Samsung Galaxy M32 मध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. ही फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. याशिवाय, या फोनला Samsung Galaxy M31 चा सक्सेसर म्हणून पाहिले जाते. तसेच हा फोन म्हणजे Samsung Galaxy A32 4जी चे रिब्रँड व्हर्जन असू शकते, असे म्हटले जात आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3v0hH63