नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट वर सुरू आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळत आहे. यातीलच एक पोको एक्स३ प्रो असून, हा फोन मार्च महिन्याच्या अखेरीस भारतात लाँच झाला होता. या फोनची किंमत १८,९९९ रुपयांपासून सुरू होते. या फोनवर एक्सचेंज ऑफर आणि ईएमआय ऑफर मिळत आहे. या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि ऑफरबद्दल जाणून घेऊया. वाचा : ची किंमत आणि ऑफर्स या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २०,९९९ रुपये आहे. या दोन्ही व्हेरिएंट्सवर १४,६०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. फोनवर पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास याच्या बेस व्हेरिएंटला ४,३९९ रुपये आणि टॉप व्हेरिएंटला ६,३९९ रुपयात खरेदी करता येईल. याव्यतिरिक्त बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास १० टक्के सूट मिळेल. याच बँकेच्या डेबिट व क्रेडिटच्या ईएमआय ट्रांझेक्शनवर १२ टक्के सूट दिली जात आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआयर खरेदी करता येईल. नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत कमीत कमी ईएमआय ३,१६७ रुपये असेल. तर स्टँडर्ड ईएमआयवर किमान ईएमआय ७१८ रुपये असेल. वाचा : Poco X3 Pro चे फीचर्स या फोनमध्ये ड्युल-सिम स्लॉट्स देण्यात आले आहे. हा फोन MIUI १२ वर आधारित अँड्राइड ११ वर काम करतो. यात ६.६७ इंच फूल एचडी+ डॉट डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे पिक्सल रिझॉल्यूशन १०८०x२४०० आहे. याचा ऑस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. याचा डायनेमिक रिफ्रेश रेट १२०Hz आणि टच सँपलिंग रेट २४० Hz आहे. यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे. हा फोन ऑक्टो-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६० प्रोसेसरवर काम करतो. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे १ जीबीपर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा देम्यात आला आहे. याचा प्रायमरी सेंसर ४८ मेगापिक्सल असून, ज्याचे अपर्चर एफ/१.७९ आहे. दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड शूटर, तिसरा २ मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि चौथा २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. फोनमध्ये २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल, ज्याचे अपर्चर एफ/२.२ आहे. फोनमध्ये ५१६० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल, जी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी यात ४G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, जीपीएस/ए-जीपीएस, यूएसपी टाइप-सी आणि ३.५mm हेडफोन जॅक मिळेल. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3v2o5cH