मुंबई: सध्या देशात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आतापर्यंत अनेकांचं या व्हायरसमुळे निधन झालं आहे. असं असताना अनेक सेलिब्रेटींनी या कठीण काळात करोनाग्रस्तांना मदतीचा हात देण्यास सुरुवात केली आहे. कोणी फंड गोळा करत आहे. तर कोणी दान करत आहे. ज्यात आता गायिका यांचाही समावेश झाला आहे. अनुराधा पौडवाल यांनी करोनाग्रस्तांसाठी दान केले आहेत. गायिका अनुराधा पौडवाल यांनी त्यांच्या सुर्योदर फाऊंडेशनतर्फे मुंबईच्या जे जे रुग्णालयात तसेच माणगाव आणि अलीबाग येथील काही रुग्णालयांना ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर दान करत करोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. 'जगण्याचं सार हे देण्यात आहे' या शब्दात अनुराधा पौडवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राव्यतिरिक्त अनुराधा पौडवाल यांनी अयोध्येतील काही रुग्णालयांनाही ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर दान केले आहेत. अनुराधा पौडवाल यांनी त्यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातूनही या आधी अनेक उपक्रमांसाठी मदतीचा हात दिला आहे. अलिकडच्याच काळात त्यांनी दुष्काळग्रस्त भागात जलसंवर्धनाच्या उपक्रमातही मदत केली आहे. याशिवाय मागच्या वर्षभरापासून त्यांची ही संस्था करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे. अनुराधा पौडवाल दरवर्षी आपल्या पतीचा वाढदिवस गरजू कलाकांरांची मदत करू साजरा करतात पण मागच्या वर्षापासून त्या करोना व्हायरसशी लढत असलेल्या करोना योद्ध्यांची मदत करत आहेत. या वर्षीही त्यांनी वैद्यकीय यंत्रणेला मदत करुन आपल्या पतीचा वाढदिवस साजरा केला. 'कोणालाही मदत करण्यासाठी आपण श्रीमंतच असायला हवं असं नाही. करोनाच्या लढ्यात मदतीसाठी मी माझं योगदान दिलं आहे आणि मी इतरांनाही आवाहन करते की, त्यांनी त्यांचं योगदान द्यावं.' असं अनुराधा पौडवाल यावेळी म्हणल्या.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uGwuCz