Full Width(True/False)

मोबाइल आणि लॅपटॉपमध्ये फाइल्स शेअर करायच्या आहेत ? OnePlus ने आणले 'हे' भन्नाट अ‍ॅप

नवी दिल्ली : चीनी टेक्नोलॉजी कंपनी वनप्लसच्या वनलॅब्स टीमने नवीन नावाचे लाँच केले आहे. या अ‍ॅपद्वारे अनेक डिव्हाइसमध्ये क्लिपबोर्डसारखे फीचर्स सुरू होतात. याद्वारे फोन, टॅबलेट आणि लॅपटॉपमध्ये टेक्स्ट, फोटो, फाइल्स पाठवता येतात. क्लिप्ट अ‍ॅपद्वारे फोनमधील टेक्स्ट कॉपी करू शकतात व आपल्या कॉम्प्यूटरमध्ये पेस्ट करता येईल. वाचा : आता फोनमधून लॅपटॉपमध्ये टेक्स्ट पाठवण्यासाठी अन्य पर्याय शोधावा लागणार नाही. डिव्हाइसमध्ये समान गुगल अकाउंट लॉगइन करून क्लिप्ट यूजर गुगल ड्राइव्ह अकाउंटचा वापर टेक्स्ट, फोटो आणि फाइल्सला ट्रांसफर करण्यासाठी करू शकतात. क्लिप्ट अ‍ॅप अँड्राइड यूजर्ससाठी गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. तर व्हिंडोज आणि मॅक यूजर्ससाठी क्लिप्ट क्रोम एक्सटेंशन म्हणून उपलब्ध आहे. आयओएस यूजर्सला मात्र या अ‍ॅपसाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. वाचा : हे अ‍ॅप आणि क्रोम एक्सटेंशन तुमच्या डिव्हाइसमध्ये एक लिंक तयार करते, जे क्लिपबोर्डला कनेक्ट करते. इंस्टॉल केल्यानंतर एका डिव्हाइसवरील टेक्स्ट दुसऱ्या डिव्हाइसवर पेस्ट करता येईल. इतर फाइल पाठवण्यास देखील यामुळे मदत होईल. या अ‍ॅपमुळे एका डिव्हाइसमधून मेलद्वारे स्वतःलाच दुसऱ्या डिव्हाइसमध्ये फाइल पाठवावी लागणार नाही. क्लिप्ट डेटा ड्रांसफरसाठी तुमच्या गुगल ड्राइव्हचा वापर करते. तुम्हाला त्याच डिव्हाइसवर साइन करावे लागेल, ज्यावर गुगल अकाउंटचा वापर करून फाइल ट्रांसफर करायची आहे. वनपल्सने सांगितले की, क्लिप्टद्वारे शेअर करण्यात आलेला डेटा सुरक्षित आहे. परमिशनमध्ये यूजर्स पाहू शकतात की कंपनी गुगल स्टोरेजला रीड व राइट करण्यासाठी परवानगी मागते. क्लिप्ट केवळ त्याच फाइल्सला डाउनलोड करेल, ज्या क्रिएट केल्या जातील. अ‍ॅप अथवा एक्सटेंशनमध्ये कंपनी शेवटच्या केवळ १० फाइल्स राहतात व नंतर त्या आपोआप डिलीट होतात, ज्यामुळे स्टोरेज देखील भरत नाही. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uI7Q4w