मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस १३' मध्ये स्पर्धक म्हणून झळकलेला तरुणाईमध्ये त्याच्या देशभक्तीपर व्हिडीओ आणि सडेतोड बोलण्यासाठी लोकप्रिय आहे. विकासला या नावानेही ओळखतात. विकासाला ८ मे रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. करोनाकाळात आंदोलन करत असल्याने कोविड- १९ चे नियम तोडल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विकास दादरमधील शिवाजी पार्क येथे आंदोलन करत होता. विकास शिवाजी पार्क येथे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द कराव्या आणि त्यासोबत त्यांची शैक्षणिक फी माफ व्हावी यासाठी काही विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करत होता. काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्क येथे काही विद्यार्थी संघटनांनीदेखील परीक्षा रद्द करण्यासाठी आणि फी माफीसाठी आंदोलन केलं होतं. आता त्यांच्या समर्थनासाठी विकासने पुढाकार घेतला होता. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी त्याच्यावर कारवाई करण्यात आली. या पूर्वीही विकास अनेक आक्षेपार्ह विधानांसाठी चर्चेत राहिला आहे. विकास सोशल मीडियावर सक्रिय असतो. काही दिवसांपूर्वी विकासने एकता कपूरच्या मालिका आणि वेबसीरिजना लक्ष्य करत म्हटलं होतं की, जर कोणी धार्मिक भावनांचा अनादर केला तर विकास त्याच्या पद्धतीने निर्णय घेत त्या विरोधात पाउल उचलेल. अशाच काही भावना भडकावणाऱ्या विधानांमुळे त्याचे इन्स्टाग्राम आणि फेसबुकदेखील सस्पेन्ड करण्यात आले आहेत. याशिवाय जेव्हा संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा कर्करोग असल्याची बातमी समोर आली होती तेव्हा विकासने संजय हे सगळं 'सडक २' च्या प्रसिद्धी साठी करत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर विकासाला ट्रोलही करण्यात आलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33rTOrF