Full Width(True/False)

'तौक्ते'चा फटका सेलिब्रिटींच्या घरांनाही, अशी झाली होती अवस्था

मुंबई : महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर 'तौक्ते' चक्रीवादळाचा फार मोठा फटका बसल्याचं दिसलं. या वादळामुळे मुंबई शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक कलाकारांच्या घरांच्या आसपासही असेच चित्र दिसत होते. जुहू येथे असलेल्या अक्षय कुमारच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. या तौक्ते वादळामुळे अनेक झाडांच्या फांद्या रस्त्यांवर पडल्या होत्या. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मलायका अरोरा हिच्या घराबाहेरही मोठमोठी झाडे आहेत. यातील काही झाडे, काही झाडांच्या फांद्या रस्त्यांवर मोडून पडल्या होत्या. या भागात अनेक जुनी झाडे आहेत. ही झाडे देखील या वादळामध्ये उन्मळून पडली होती. आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर हे दोघेजण जुहू येथील एका कॉम्प्लेक्समध्ये एकत्र राहतात. त्यांच्या कॉम्प्लेक्सच्या परिसरातही अनेक झाडे या वादळामध्ये पडली आहेत. त्यांच्या कॉम्प्लेक्सच्या प्रवेशद्वाराजवळच झाडांच्या अनेक फांद्या मोडून पडलेल्या होत्या. नीतू सिंग यांच्या वांद्रे येथील 'कृष्णा राज' बंगल्याबाहेरही अनेक झाडे आहेत. तौक्ते वादळामध्ये अनेक मोठ मोठी झाडे उन्मळून पडली होती. ही झाडे इतकी मोठी होती की ती उचलण्यासाठी क्रेन बोलवावी होती. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र हे जुहू येथे वास्तव्यास आहेत. या परिसरात अनेक मोठी आणि जुनी झाडे आहेत. या तौक्ते वादळामुळे या परिसरातील अनेक झाडे मोडून रस्त्यावर पडली आहेत. जितेंद्र यांच्या घराबाहेरही अनेक झाडांच्या फांद्या मोडून पडल्या होत्या. सैफ अली खान याचे घर बांद्रा परिसरातील उच्चभ्रू परिसरात आहे. या परिसरातही या तौक्ते वादळामुळे अनेक ठिकाणची झाडे, झाडांच्या फांद्या मोडून रस्त्यावर पडल्या होत्या. सैफ अली खानच्या घराबाहेरही अनेक फांद्या मोडून पडल्या होत्या. सैफ अलीची मुलगी सारा, तिची आई अमृता आणि भाऊ इब्राहिम रहात असलेल्या घरासमोरही अनेक झाडे पडली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33W2aYX