Full Width(True/False)

अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या वडिलांचे करोनामुळे निधन

मुंबई : स्टार प्रवाहवरून प्रसारित होणाऱ्या ‘’ मालिकेत अनघा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री हिच्या वडिलांचे मंगळवारी १८ मे रोजी निधन झाले. अश्विनीचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. हे उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी अश्विनीच्या वडिलांचा करोनाची रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना भोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी, १८ मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीपकुमार हे वाई जिल्ह्यातील पसरणी येथील ज्येष्ठ समाजसेवक होते. अश्विनीच्या अभिनेत्री होण्याच्या वाटचालीमध्ये तिच्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अश्विनीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. याआधी अश्विनीने झी मराठीवरून प्रसारित होणाऱ्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत राणू अक्का साहेब या भूमिकेत दिसली होती. या मालिकेमुळे अश्विनी घराघरात राणू अक्का म्हणून लोकप्रिय झाली होती. याशिवाय अश्विनीने ‘टपाल’ आणि ‘बॉइज’ या चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3w9qd2G