Full Width(True/False)

मुनमुन दत्तावर अटकेची तलवार, अजामीनपात्र गुन्ह्याची तक्रार दाखल

हांसी- '' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री हिच्या अडचणी काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. अभिनेत्रीविरोधात हरियाणा राज्यातील हांसी येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुनमुनवर एका युट्युब व्हिडीओमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना उद्देशून आक्षेपार्ह शब्द उच्चारल्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुनमुनने व्हिडीओ वायरल होताच सोशल मीडियावर सगळ्यांची माफीदेखील मागितली होती आणि तिच्या बोलण्याचा रोख एखाद्याच्या जातीकडे नव्हता असं स्पष्ट केलं होतं. यानंतरही तक्रार दाखल झाल्याने अभिनेत्रीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. नॅशनल अलायन्स फॉर दलित ह्युमन राइट्सचे मुख्य अधिकारी रजत कलसन यांनी मुनमुन विरोधात तक्रार दाखल केली आहे. मुनमुनवर दलित समाजाला जातीवरून हिणवण्याची आणि अनुसूचित जाती- जमातींविरुद्ध आक्षेपार्ह शब्द उच्चारल्याची तक्रार करण्यात आली आहे. रजत यांनी म्हटलं, 'अभिनेत्रीचे लाखो फॉलोवर्स आहेत. तिने ही गोष्ट फक्त आम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी म्हटली. त्यामुळे आम्ही तक्रार केली.' मुनमुनवर ज्या कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे ते सर्व कलम अजामीनपात्र गुन्ह्याचे आहेत. त्यामुळे जर पोलिसांनी मुनमुनला अटक केली तर तिला जामीन मिळणार नाही. मुनमुनने काही काळापूर्वी एक व्हिडीओ चित्रित केला होता ज्यात तिने एका आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. हा व्हिडीओ प्रचंड वायरल झाला होता. सोशल मीडियावर युझर्सनी तिच्याविरोधात संतापही व्यक्त केला होता. त्यानंतर अभिनेत्रीच्या अटकेची जोरदार मागणी करण्यात आली. परंतु, मुनमुनने आपण तो शब्द जाणूनबुजून वापरला नसल्याचं सांगत सोशल मीडियावर माफी मागितली होती. आता दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर जर अभिनेत्रीला अटक करण्यात आली नाही तर आम्ही जोरदार प्रदर्शन करू असा इशारा अनुसूचित जाती आणि जमातींकडून देण्यात आला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hn7s7B