नवी दिल्ली. Tauktae चक्रीवादळ आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या मोबाईल नंबर्सची वैधता वाढविण्याची घोषणा भारत संचार निगम लिमिटेड ( बीएसएनएल ) तर्फे करण्यात आली आहे . वैधता वाढविण्यासह बीएसएनएल तर्फे प्रभावित ग्राहकांना कॉलिंगसाठी १०० मिनिटे मोफत मिळणार आहे. प्रभावित ग्राहकांच्या मोबाईल नंबर्सची वैधता ३१ मे पर्यंत वाढविण्यात आली असल्याचे देखील बीएसएनएलतर्फे सांगण्यात आले आहे. हे विस्तार कोणत्याही किंमतीशिवाय केले जात आहेत. यामुळे या कोरोना काळात ग्राहकांना कोणतीही गैरसोय न होता कॉलची सुविधा मिळू शकेल. सोबतच ग्राहकांना कॉलिंग साठी १०० मिनिटे मोफत. वाचा : ज्या ग्राहकांची वैधता 1 एप्रिल रोजी किंवा नंतर संपत आहे अशा ग्राहकांना ही सुविधा दिली जात आहे. बीएसएनएलचे अध्यक्ष प्रवीण कुमार पुरवार म्हणाले की, रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांनी किरकोळ स्टोअरवर अवलंबून न राहता ऑनलाईन पर्यायांचा देखील वापर करावा. रिचार्जसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यात ते मायबीएसएनएल मोबाइल App बीएसएनएल वेबसाइट किंवा लोकप्रिय वॉलेट सेवेद्वारे रिचार्ज करू शकतात. माय बीएसएनएल वरून रिचार्ज करणार्या ग्राहकांना ४ टक्के सूट देखील दिली जात आहे. गेल्या महिन्यात बीएसएनएलने ३९८ रुपयांच्या रिचार्ज प्लानची वैधता वाढविली होती . ही ऑफर ९ एप्रिल रोजी संपणार होती, परंतु आता ही योजना ८ जुलैपर्यंत वाढविली जाईल. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fuQbXC