नवी दिल्लीः देशात करोना व्हायरस संसर्ग वाढला आहे. त्यामुळे देशात लस मोहीम सुरू करण्यात आली आहे. अनेक जण एकमेकांना मदत करीत आहेत. भारतात आलेल्या करोनाच्या संकटावर मात देण्यासाठी अनेक टेक आणि ऑटो कंपन्यांनी पुढे येऊन मदत केली आहे. आता प्रसिद्ध ऑटो कंपनी उबरनेही मदत करण्याचे जाहीर केले आहे. उबर आता लोकांना फ्री राइड देणार आहे. कोविड १९ लस आता १८ वर्षावरील व्यक्तींना घेता येऊ शकते. त्यामुळे उबरने एक डिस्काउंट घोषणा जाहीर केली आहे. वाचाः Uber ची Free राइड उबर लस घेण्यासाठी जात असलेल्या व्यक्तींना फ्री राइड ऑफर करीत आहे. उबर फ्री राइड वॅक्सिनेशन सेंटर पर्यंत जाणाऱ्या व्यक्तींसाठी ही ऑफर देत आहे. याचा उपयोग करून युजर जवळच्या वॅक्सनेशन सेंटर पर्यंत जाऊ शकतात. करोना लस घेऊन परत येऊ शकतात. वाचाः Uber ने दिल्लीसह देशातील ३४ शहरात १० कोटी रुपयांची फ्री राइड देण्याची घोषणा केली आहे. ही फ्री राइड त्या लोकांसाठी दिली जाणार आहे. जे लोक करोना लस घेण्यासाठी जात आहेत. फ्री राइड घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या लस सेंटरपर्यंत जाऊ शकतात. ही फ्री राइड सोप्या प्रोमो कोड्स द्वारे मिळवता येऊ शकते. वाचाः या स्टेप्स फॉलो करा
- सर्वात आधी तुम्ही Uber अॅपला ओपन करा.
- Uber अॅपमध्ये टॉप लेफ्ट मध्ये तुम्हाला Walletचा ऑप्शन दिसेल. याला सिलेक्ट करा.
- यानंतर खाली तुम्हाला Add Promo Code चा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करुन 10M21V प्रोमो कोड टाका.
- आता अॅपच्या होम स्क्रीनवर नेविगेट करा. या ठिकाणी पिकअप किंवा ड्रॉप-ऑफ लोकेशन टाका.
- हे तुम्हाला तुमच्या जवळच्या लस सेंटरचा असायला हवा. त्यानंतर ट्रिप कन्फर्म करा.
- भारतासह उबरची ही सर्विस अमेरिकेत सुद्धा सुरू आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Rvu0Za