Full Width(True/False)

KBC 13 : बिग बी यांनी विचारलेल्या सहाव्या प्रश्नाचं उत्तर येतं का?

मुंबई- स्वप्न तर सगळेच पाहतात पण ती पूर्ण करण्याची हिम्मत फार कमी जणांमध्ये असते. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत तर करावीच लागते. मग ती मेहनत शारीरिक असुदे किंवा बौद्धिक. जर तुम्ही बौद्धिक मेहनत करायला तयार असाल तर तुमच्या ज्ञानाच्या जोरावर तुमची स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकता. कारण छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम '' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नाची उत्तरं देऊन तुम्हीही करोडपती बनू शकता. चला तर मग या कार्यक्रमातील सहाव्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि हॉट सीटवर बसायचा मान मिळवा. 'कौन बनेगा करोडपती १३' मध्ये सहभागी होण्यासाठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अभिनेते प्रेक्षकांना दररोज एक प्रश्न विचारतात. आतापर्यंत निरनिराळ्या क्षेत्रांशी संबंधित पाच प्रश्न विचारण्यात आले आहेत. आता अमिताभ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सहावा प्रश्नदेखील विचारला आहे. सहावा प्रश्न खेळासंबंधित आहे. विचारण्यात आलेला प्रश्न आहे- बॅडमिंटन खेळात ऑलिम्पिक जिंकणारी पहिली महिला कोण होती? या प्रश्नासाठी उत्तरांचे ऑप्शन आहेत. A) ज्वाला गुट्टा B) सानिया मिर्झा C) सायना नेहवाल D) पी व्ही सिंधू. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन C- सायना नेहवाल. सायना नेहवालने २०१२ साली महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक मिळवून इतिहास रचला होता. तुम्ही योग्य उत्तर सोनी लिव्ह अँपवरून देऊ शकता. तुम्हाला तुमच्या फोनमध्ये सोनी लिव्ह अँप डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर तुमचा फोन नंबर, वय आणि लिंग ही माहिती द्यावी लागेल. यासोबत तुम्ही योग्य उत्तर लिहून पाठवू शकता. तुम्ही SMS द्वारेही योग्य उत्तर देऊ शकता. उत्तर देण्यासाठी तुम्हाला फोनच्या मेसेज बॉक्स मध्ये जाऊन KBC (स्पेस) योग्य उत्तर ( स्पेस) तुमचं वय (स्पेस) तुमचं लिंग टाइप करून ५०९०९३ या नंबरवर पाठवायचं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33PYJTs