Full Width(True/False)

KBC 13: रजिस्ट्रेशनचा सातवा प्रश्न भारतीय राजकारणाशी संबंधित

मुंबई : छोट्या पडद्यावर 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून लोकप्रिय झालेला आहे. या लोकप्रियतेमुळेच या कार्यक्राचे १३ वे पर्व लवकरच सोनी टिव्हीवरून प्रसारित केले जाणार आहे. या तेराव्या पर्वासाठी रजिस्ट्रेशनसाठी प्रश्न विचारत आहेत. या प्रश्नाचे जर प्रेक्षकांनी अचूक उत्तर दिले तर त्यांना या कार्यक्रमातील 'हॉस सीट'वर बसण्याची संधी मिळणार आहे. या संधीमुळे त्यांचे नशीब बदलू शकणार आहे. अमिताभ बच्चन यांनी रविवारी, सातवा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न भारतीय राजकारणावर आधारीत होता. अमिताभ बच्चन यांनी सातवा प्रश्न विचारण्याआधी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, 'या कार्यक्रमात सहभागी होण्याची सुवर्णसंधी तुम्हा प्रेक्षकांना मिळत आहे. तर या संधीचा तुम्ही सगळ्यांनी नक्की लाभ घ्या. मी विचारणा-या सातव्या प्रश्नाचे उत्तर आज रात्री नऊ वाजण्याआधी आमच्यापर्यंत नक्की पाठवा. तुमचे उत्तर बरोबर असेल तर तुमचे नशीब बदलवू शकणाऱ्या 'हॉट सीट' पर्यंत नक्की पोहोचू शकाल.' यानंतर अमिताभ बच्चन यांनी सातवा प्रश्न विचारला. हा प्रश्न असा होता... खालील पैकी कोणत्या राज्यात लागोपाठ तीनवेळा 'रावत' आडनावाच्या मुख्यमंत्र्यांनी कार्यभार सांभाळला होता? पर्याय आहेत- उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड अचूक उत्तर आहे उत्तराखंड या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना सोनी लिव अॅप अथवा त्यांच्या वेबसाइटवर जाऊन द्यायचे आहे. त्यासोबत तुमचे वय, संपर्कासाठी मोबाइल क्रमांक आणि पत्ताही नोंदवायचा आहे. तसेच एसएमएस करूनही या प्रश्नाचे उत्तर देता येणार आहे. त्यासाठी फोनवर KBC असे लिहून योग्य पर्याय लिहून हे उत्तर ५०९०९३ या क्रमांकावर पाठवायचे आहे. 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम जनसामान्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. दरवर्षी हा कार्यक्रम कधी सुरू होतो याची उत्सुकता प्रेक्षकांना असते. कारण या कार्यक्रमात सहभागी होऊन नशीब बदलण्याची संधी त्यांना मिळणार असते. गेल्यावर्षी करोना संकटकाळतही हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. त्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3w9dBsi