नवी दिल्लीः आगामी काळ हा 5G स्मार्टफोन्स आहे. हे डोळ्यासमोर ठेऊन स्मार्टफोन्स कंपन्यांनी आपली तयारी अधिक वेगवान केली आहे. मार्केटमध्ये 5G स्मार्टफोन्स ला लाँच करणे सुरू केले आहे. रियलमी कंपनी सुद्धा आपला ५जी स्मार्टफोन्सवर काम करीत आहे. कंपनीने गेल्या काही महिन्यात अनेक ५ जी स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. आता कंपनी 5G स्मार्टफोन्स सेगमेंट मध्ये मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच रियलमीच्या ग्लोबल ५ जी संमेलन मध्ये कंपनीचे इंडिया हेड माधव शेठ यांनी म्हटले की, कंपनी ७ हजार रुपयांच्या जवळपास किंमत असलेला 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. वाचाः सर्व सेगमेंट मध्ये पकड मजबूत करण्याची तयारी करणाऱ्या रियलमीच्या ५जी स्मार्टफोन्सची रेंजमध्ये अनेक नवीन हँडसेट्सची एन्ट्री करणार आहे. कंपनीचे नंबर सीरीजच्या स्मार्टफोन एन्ट्री-लेवल सेगमेंटला टारगेट करणार आहे. तसेच नार्जो सीरीज ५जी डिव्हाइसच्या मिड रेंज सेगमेंटमध्ये कंपनीची पकड मजबूत होणार आहे. तर कंपनीची अपकमिंग जीटी सीरीजच्या डिव्हाइस प्रीमियम फ्लॅगशीप सेगमेंटमध्ये लाँच केले जाणार आहेत. वाचाः नंबर सीरीज अंतर्गत येऊ शकतो ७ हजारांचा ५जी स्मार्टफोन रियलमीचा ७ हजार रुपये किंमतीचा ५जी स्मार्टफोन कंपनीची नंबर सीरीजच्या हँडसेट्सचा एक भाग असू शकतो. रियलमी ८ प्रो कंपनीची नंबर सीरीज अंतर्गत लाँच होणारी सर्वात लेटेस्ट स्मार्टफोन होता. हा फोन १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत येतो. परंतु, या सीरीजमध्ये कंपनी कोमताही ५जी स्मार्टफोन ऑफर करीत नाही. वाचाः २०२२ पर्यंत २० हून जास्त ५जी स्मार्टफोन्स लाँच करण्याची तयारी रियलमीच्या पोर्टफोलियोत आता अनेक जबरदस्त ५जी स्मार्टफोन उपलब्ध आहेत. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या रियलमी ८ ५जी भारतातील सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन पैकी एक आहे. कंपनी १५ हजार रुपये ते २० हजार रुपयांच्या सेगमेंट मध्ये नार्जो 30 प्रो 5G आणि रियलमी X7 सारखे स्मार्टफोन ऑफर करीत आहे. माधव शेठ यांनी सांगितले की, कंपनी या वर्षी जास्तीत जास्त ५जी स्मार्टफोन लाँच करण्याची प्लानिंग करीत आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3plwgPo