नवी दिल्ली. चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने भारतात लाँच केला आहे. हा कंपनीचा बजेट सीरिजमधील स्मार्टफोन आहे. OnePlus Nord 2 5G ची रचना OnePlus 9 मालिकेसारखीच आहे. OnePlus Nord 2 5G चे तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असून यात ब्लू हेज, ग्रे सिएरा आणि ग्रीन वुड्स यांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन तीन रॅम व्हेरिएंटसह येतो. बेस व्हेरिएंटमध्ये ६ जीबी रॅमसह १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅमसह १२८ जीबी स्टोरेज आहे. तर, टॉप एन्ड व्हेरिएंटमध्ये १२ जीबी रॅमसह २५६ जीबी स्टोरेज मिळेल. वाचा: भारतात OnePlus Nord 2 5G ची किंमत २७,९९९ रुपयांपासून सुरू होईल. २८ जुलैपासून भारतात विक्री केली जाईल. ६ जीबी रॅम व्हेरिएंट २७,९९९ रुपये, तर, ८ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये आहे. १२ जीबी स्टोरेज व्हेरिएंट तुम्हाला ३४,९९९ रुपयांत खरेदी करता येईल. OnePlus Nord 2 5G मध्ये ६.४३ इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे, जो फुल एचडी प्लस आहे. यात एक पंच होल आहे जेथे सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मीडियाटेक डायमेन्सिटी १२०० एआय चिपसेट देण्यात आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर ते काम करेल असा दावा कंपनीने केला आहे. यात ५० मेगापिक्सलचा प्राथमिक लेन्स देण्यात आला आहे. येथे कंपनीने सोनी आयएमएक्स ७६६ वापरला आहे. त्याशिवाय, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. यात २ मेगापिक्सेल मोनो लेन्स असून सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेर्याबद्दल बोलायचे तर, त्यात मल्टी-ऑटो फोकस देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त तुम्ही यासह ४ के व्हिडिओ शूट करू शकता. ड्युअल व्ह्यू व्हिडिओ देखील आहे, ज्या अंतर्गत पुढील आणि मागील कॅमेरे एकाच वेळी सक्रिय करून सहज व्हिडिओ किंवा फोटो घेतले जाऊ शकतात. OnePlus Nord 2 5G मध्ये ४,५०० एमएएच बॅटरी आहे. जी ६५W फास्ट चार्जला सपोर्ट करते. कंपनीने असा दावा केला आहे, की केवळ ३० मिनिटांत फोन ० ते १०० % चार्ज केला जाऊ शकतो. असा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड ११ आधारित ऑक्सिजन ओएस ११.३ समर्थित आहे. सर्व मोठी सॉफ्टवेअर अपडेट्स २ वर्षांसाठी उपलब्ध असतील. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला असून यात हॅप्टिक्स २.० वापरण्यात आला आहे. हा फोन कंपनीच्या वेबसाइटसह Amazon इंडिया किंवा ऑफलाइन स्टोअरमधून खरेदी करता येईल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rvBxVu