Full Width(True/False)

३८ तास बॅटरी लाइफसह OnePlus चे नवीन इयरबड्स लाँच, फीचर एकापेक्षा एक दमदार; पाहा किंमत

नवी दिल्ली : ने आपला नवीन स्मार्टफोन ला लाँच केले आहे. यासोबतच कंपनीने ला देखील लाँच केले आहे. हे सिलिकॉन टिप्स आणि अडॅप्टिव्ह नॉइज कॅन्सिलेशनसह येतात. वाचा: कंपनीचा दावा आहे की, OnePlus Buds Pro हे 7 तासांच्या बॅटरी लाइफसह येतात. चार्जिंग केससोबत ३८ तासांची बॅटरी लाइफ मिळेल. इयरबड्स यूजरच्या आजुबाजूचा ४० डेसिबलपर्यंतच आवाज कमी करण्यास सक्षम आहे. कंपनीचा दावा आहे की, याचे फीचर या इयरबड्सला शानदार बनवतात. यात तीन मायक्रोफोन देण्यात आले आहे. याद्वारे क्रिस्टल क्लिअर कॉल करता येईल. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.२ देण्यात आले आहे. हे ९४एमएस अल्ट्रा लो लेटेंसीसह येतात. पाणी आणि घामापासून देखील हे इयरबड्स सुरक्षित राहतात. याला आयपी५५ रेटिंग मिळाले आहे. इयरबड्स स्मार्ट एएनसी सोबत येतात. यात रियल टाइममध्ये नॉइजल कंट्रोल करता येते. वाचा: वनप्लसच्या इयरबड्स मध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्ट देखील मिळतो. यात ११एमएमचे डायनॅमिक ड्राइव्हर देण्यात आले आहे. याद्वारे, याच्या बेस क्वालिटीला देखील वाढवता येईल. पर्सनलाइज ऑडिओ एक्सपिरियन्ससाठी यूजर्स इयरबड्सला OnePlus Audio ID सोबत कनेक्ट करू शकतात. हे यूजरच्या गरजेनुसार साउंड प्रोफाइलला अपडेट करेल. बड्स Wrap Charge सोबत येतात. म्हणजेच, १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये १० तास चालतील असा कंपनीने दावा केला आहे. OnePlus Buds Pro ला OnePlus 9 Pro द्वारे वायरलेस चार्ज देखील करता येईल. इयरबड्स Matte Black आणि Glossy White रंगात येतात. याची किंमत १५० डॉलर (जवळपास ११ हजार रुपये) आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rtNlHT