Full Width(True/False)

प्रियांका चोप्राच्या हॉटेलमध्ये विकला जातोय वडापाव- सामोसा

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल ने अभिनयाबरोबरच रेस्तराँ इंडस्ट्रीमध्येही प्रवेश केला आहे. तिने न्यूयॉर्कमध्ये सोना हे भारतीय पदार्थांचे रेस्तराँ सुरू केले. यामध्ये अस्सल मुंबईचा पदार्थ अर्थात वडापाव आणि समोसा विकला जात आहे. विशेष म्हणजे पाणीपुरी, वडापाव आणि सामोसा हे येथील लोकप्रिय पदार्थ झाले आहेत. प्रियांकाच्या या रेस्तराँमुळे अमेरिकेतील नागरिकांना आणि तिथे राहणाऱ्या भारतीयांनाही अस्सल भारतीय पदार्थांची चव चाखायला मिळते आहे. या रेस्तराँमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. अलिकडेच ख्यातनाम निर्माती लोला जेम्स यांनी देखील सोनाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी वडा पावची चव चाखली. तसेच त्यांनी भेळ, चाट आणि बरेच पदार्थ खाल्ले. याविषयी लोला यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, 'न्यूयॉर्कमध्ये असलेले हे सोना अप्रतिम चवीचे रेस्तराँ आहे. येथे रुचकर आणि चविष्ट जेवणाचा आस्वाद नक्की घ्या.' पाणीपुरी, डोसा, कुल्चा यांसारखे लोकप्रिय भारतीय पदार्थ या रेस्तराँच्या मेनूमध्ये आहेत. अर्थात हे अस्सल भारतीय आणि जीभेचे चोचले पुरवणारे पदार्थ जर तुम्हाला चाखायचे असतील तर खिसा रिकामा करण्याची तयारी हवी. कारण मुंबईमध्ये जो वडा पाव अगदी महागातला म्हटला तरी ३० रुपयांच्या वर जात नाही. परंतु प्रियांकाच्या या सोना रेस्तराँमधील वडापावची चव घ्यायची असेल तर त्यासाठी १४ डॉलर्स म्हणजे १ हजार ३९ रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर सामोसासाठी ही तेवढेच पैसे खर्च करण्याची तयारी हवी. प्रियांकाच्या रेस्तराँमधील मेन्यू कार्डमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश आहे आणि त्यांच्या किंमती कशा आहेत ते पाहून घेऊ. समर कॉर्न भेल, हॅश ब्राऊन, आलू टिक्की, वडापाव, सामोसा, मटन एग, यांसारखे पदार्थ १४ डॉलर्सना तर श्रीखंडासाठी १२ डॉलर्सना आहे. सोना रेस्तराँमध्ये अंड्यापासून तयार केलेल्या वेगवेगळे पदार्थ देखील मिळतात. त्यामध्ये मसाला एग, एग अँड चीज डोसा, मशरुम भुर्जी आणि देसी एग बेनेडिक्ट या पदार्थांचा समावेश आहे. याच्या किंमती १८ ते २२ डॉलर्सच्या घरात आहेत. तर मोठ्या थाळीची किंमत १८ ते २८ डॉलर इतकी आहे. याशिवाय गोड भारतीय पदार्थांमध्ये खीर, मँगो पॅशन सरबत अशा विविध पदार्थांचा समावेश आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lxtoiH