Full Width(True/False)

मुंबईकरांसाठी गुड न्यूज; १९६ रुपयांत महिनाभर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः सरकारी टेलीकॉम कंपनी महानगर टेलीकॉम निगम लिमिटेड () ने मुंबई सर्कलसाठी आपल्या प्रीपेड प्लानला ९० दिवसांसाठी वाढवण्यात आले आहे. या प्रमोशनल प्लानची किंमत १९६ रुपयांपासून सुरू होते. १ वर्षासाठी १४९९ रुपयांच्या प्लानपर्यंत जाते. यासोबतच एमटीएमएलचे तीन महिन्यासाठी लँडलाइन नंबरसाठी ९९ रुपयांचा एक नवीन लँडलाइन प्लान सुद्धा आणला आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचा: १९६ रुपयाचा MTNL प्रीपेड प्लान या प्रीपेड प्लानला सर्वात आधी OnlyTech ने नोटिस केले होते. १९६ रुपयांचा हा प्रीपेड प्लान त्या लोकांसाठी खास आहे ज्यांना स्वस्त किंमतीत महिनाभर डेटा आणि कॉलिंग हवी आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता सोबत रोज १.५ जीबी डेटा मिळतो. सोबत सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळतात. एमटीएनएल मुंबई युजर्ससाठी या प्लान्सला ई-रिचार्ज, ऑनलाइन रिचार्ज आणि एसएमएस द्वारे अॅक्सेस करू शकता येते. वाचा: ३२९ रुपये आणि ३९९ रुपयाचे MTNL प्रीपेड प्लान दुसरा प्लान ३९९ रुपयाचा आहे. यात ग्राहकांना ४५ दिवसाची वैधता आणि रोज २ जीबी डेटा दिला जातो. याप्रमाणे एकूण डेटा ९० जीबी दिला जातो. यासोबतच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळतात. या सेगमेंट मध्ये पुढील टॅरिफ व्हाउचर ३९९ रुपयाचा आहे. यात रोज १ जीबी फ्री डेटा, अनलिमिटेड लोकल व एसटीडी कॉल आणि रोज १०० एसएमएस आणि २८ दिवसांसाठी वैधता मिळते. वाचा: १४९९ रुपयाचा MTNL प्रीपेड प्लान १४९९ रुपयाच्या किमतीचा प्रीपेड व्हाउचर एक वर्षाचा प्लान आहे. यात ग्राहकांना ३६५ दिवसाची वैधता मिळते. ग्राहकांना रोज २ जीबी डेटा फ्री, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, रोज १०० एसएमएस दिले जाते. एमटीएनएल १२९८ रुपयाच्या किंमतीचा एक वर्षाचा प्लान ऑफर करीत आहे. ३६५ दिवसासाठी टॅरिफ वैधता सोबत रोज २ जीबी डेटा फ्री दिला जातो. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iUxj7w