जर तुम्ही या सिझनमध्ये नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आज आम्ही तुमच्यासाठी काही स्मार्टफोनची माहिती घेऊन आलो आहोत. स्मार्टफोन विभागात Oppo चा उल्लेख आवर्जून केला जातो. Oppo Company आपल्या युजर्सना कमी किंमतीत एकापेक्षा जास्त वैशिष्ट्यांसह अनेक स्मार्टफोन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या स्मार्टफोन्समध्ये एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स आहेत. शिवाय, स्मार्टफोन चांगले सेल्फी तसेच मजबूत बॅटरी बॅकअप सुद्धा देतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची किंमत सर्वांच्याच बजेटमध्ये आहे. हे डिव्हाईस तुम्ही १०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. यात A33, A15, Oppo A12 सारख्या काही दमदार फोन्सचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया Oppo च्या टॉप ५ स्मार्टफोनबद्धल जे तुम्ही १०,००० पयांपेक्षा कमी किंमतीत घरी आणू शकता.

Oppo A11k
यात ६.२ इंच HD+ डिस्प्ले आहे ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन ७२० x १५२०आहे. हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो पी ३५ प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज आहे. फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४२३० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनची किंमत ८,९९० रुपये आहे.
Oppo A12
यात ६.२ इंच HD+ TFT डिस्प्ले आहे ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 720x1520 आहे. हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो पी 35 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज आहे. तसेच ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४२३० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. बेस व्हेरिएंटची किंमत ८,९९० रुपये आहे. तर, दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत ९,९९० रुपये आहे.
Oppo A5s
हे डिव्हाईस Android वर काम करते. यात ६.२ इंच HD+ इन-सेल डिस्प्ले आहे. ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन ७२०x१५२० आहे. हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो पी ३५ प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज आहे. तसेच ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४२३० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ३ जीबी रॅम ३२ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत ९,४९० रुपये आहे.
Oppo A15
यात ७२० x १६०० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.५ इंच HD+ डिस्प्ले आहे. हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो पी ३५ प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात २ जीबी रॅम आणि ३२ स्टोरेज व्हेरिएंट आहेत. हे ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह सुसज्ज आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४२३० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी १० W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. बेस व्हेरिएंटची किंमत ९,४९० रुपये आहे. तर, दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत १०,४९० रुपये आहे.
Oppo A 33
यात ६.५ इंच HD+ पंच-होल डिस्प्ले आहे. ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन ७२०x१६०० आहे. त्याचा रिफ्रेश रेट ९०Hz आहे. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४६० प्रोसेसरने सुसज्ज आहे. हे ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह सुसज्ज आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. फोनला शक्ती देण्यासाठी ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी, १८ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. तसेच फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. बेस व्हेरिएंटची किंमत ९,९९० रुपये आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3soqpu3