Full Width(True/False)

बाल आधारसाठी आता जन्म प्रमाणपत्राची प्रतीक्षा करावी लागणार नाही, लगेच होईल काम, फॉलो करा 'या' स्टेप्स

नवी दिल्ली: युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) पाच वर्षांखालील मुलांसाठी निळ्या रंगाचे आधार जारी करते. पूर्वी ते ऑनलाईनही करता येत होते. पण, आता ने त्याची प्रक्रिया आणखी सोपी केली आहे. लोकांना सहजपणे त्यांच्या मुलांचे आधार कार्ड बनवता यावे नियम सहज केले गेले आहेत. नवजात मुलांचे आधार देखील लगेच बनवता येतो. वाचा: यूआयडीएआयने ट्विट केले होते की मुलांचे आधार कार्ड अर्ज डिस्चार्ज स्लिप किंवा जन्म प्रमाणपत्रासह पालकांपैकी एकाच्या आधार कार्डवरून केले जाईल. म्हणजेच, आता पालकांना त्यांच्या मुलांसाठी आधार कार्ड मिळवण्यासाठी जन्म प्रमाणपत्र तयार होत पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही. यूआयडीएआयतर्फे सांगण्यात आले आहे की, आता ५ वर्षांखालील मुलांसाठी आधार कार्ड बनवताना फिंगरप्रिंट आणि आय-स्कॅन होणार नाही. फक्त मुलांची छायाचित्रे घेतली जातील. मुलं ५ वर्षाची झाल्यानंतर , बायोमेट्रिक डेटा अपलोड करावा लागेल. जर तुम्हाला तुमच्या मुलांचे आधार कार्ड बनवायचे असेल तर तुम्ही हे काम ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करू शकता. ऑनलाइन प्रक्रियेसाठी तुम्हाला UIDAI वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यासाठी काही सोप्प्या टिप्स तुमची मदत करतील. पाहा टिप्स मुलांसाठी आधार कार्ड कसे बनवायचे:
  • सर्वप्रथम तुम्हाला UIDAI.gov.in ला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नोंदणीकृत लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला मुलाचे वैयक्तिक तपशील जसे की नाव, फोन नंबर, ईमेल आयडी टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला जन्म ठिकाण, पत्ता, जिल्हा आणि मुलाचे राज्य यासारखी माहिती प्रविष्ट करावी लागेल.
  • UIDAI च्या केंद्रातूनच आधार कार्ड दिले जाते, त्यामुळे ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्राला भेट द्यावी लागेल.
  • यासाठी तुम्हाला Fix Appointment च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तारीख निवडावी लागेल, ज्या दिवशी तुम्ही जवळच्या केंद्राला भेट देऊ शकता.
  • त्यानंतर तुम्हाला जवळचे आधार केंद्र निवडावे लागेल. एकदा संपूर्ण माहिती प्रविष्ट केली की, नंतर पालकांनी मुलाची सर्व माहिती जसे की नाव आणि जन्मतारीख इत्यादी पुन्हा तपासावी.
  • काही चूक असल्यास ती दुरुस्त करा त्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lsDwZT