नवी दिल्ली : ची अधिकृत वेबसाइट Mi.com वर सेल सुरू आहे. या दरम्यान आणि एमआयच्या अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट दिले जात आहे. या सेलचा आज शेवटचा दिवस आहे. सेलमध्ये तुम्ही आणि सारखे ऑफर्ससह खरेदी करू शकता. सेलमध्ये फ्लॅट डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट ईएमआयसह अनेक शानदार ऑफर्स मिळत आहे. याविषयी जाणून घेऊया. वाचाः Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २२,९९९ रुपये आहे. फोनला ३ हजार रुपये फ्लॅट डिस्काउंटनंतर १९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये आहे. हे व्हेरिएंट २ हजार रुपये फ्लॅट डिस्काउंटनंतर २१,९९९ रुपयात मिळेल. कंपनीच्या वेबसाइटनुसार, फोनवर १ हजार रुपये अतिरिक्त सूट देखील दिली जात आहे. युजर्सला क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १५०० रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. फोनला नो-कॉस्ट ईएमआयसह खरेदी करू शकता. फोनवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास दोन्ही व्हेरिएंट क्रमशः ८,९९९ रुपये आणि १०,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय १० हजार रुपयांपर्यंत जिओ बेनिफिट्स मिळतो. फोन Mi Screen Protect अंतर्गत येतो. Mi 11X Pro या स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४७,९९९ रुपये असून, ८ हजार रुपये फ्लॅट डिस्काउंटनंतर हँडसेट ३९,९९९ रुपयात मिळेल. याच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये आहे. मात्र, ८ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंटनंतर ४१,९९९ रुपयात मिळेल. कंपनी वेबसाइटनुसार, यावर ५ हजार रुपये अतिरिक्त सूट देखील दिली जात आहे. युजर्सने एसबीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर करून फोन खरेदी केल्यास ३ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. नो-कॉस्ट ईएमआयचा देखील पर्याय आहे. फोनवर १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळते. जुन्या फोनवर पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास दोन्ही व्हेरिएंट क्रमशः २४,९९९ रुपये आणि २६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोन Mi Screen Protect अंतर्गत येतो. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CdhhNo