मुंबई : 'इंडियन आयडल'च्या १२ व्या पर्वाचे व्यासपीठ गाजवलेली सुरेल आवाजाची गायिका हिला मराठी सिनेमासाठी पार्श्वगायनाची संधी मिळाली आहे. इंडियन आयडलचे पर्व संपल्यानंतर लगेचच सिनेसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून पदार्पण करायचे सायलीचे स्वप्न पूर्ण झाले. जो राजन यांनी दिग्दर्शित केलेल्या '' या सिनेमासाठी सायलीने गाणे गायले आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शक यांनी केले आहे. माझे स्वप्न साकार झाले अवधूत गुप्तेंच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाण्याची संधी सायलीला या सिनेमाच्या निमित्ताने मिळाली आहे. याबद्दल सायलीने सांगितले की, 'माझा तर अजूनही विश्वासच बसत नाहीये की माझे पार्श्वगायिका होण्याचे स्वप्न साकार झाले. इंडियन आयडलमध्ये जाण्याचे कारणच होते, लोकांनी मला ओळखावे आणि माझे संगीत क्षेत्रात करिअर सुरू व्हावे. इंडियन आयडलचा ग्रँड फिनाले झाल्यावर लगेच हातात काम मिळणे हे माझ्यासाठी नक्कीच मोठी गोष्ट आहे. लहानपणापासून अवधूत गुप्ते यांची मी चाहती आहे आणि त्यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळते आहे याचा मला खूप आनंद आहे. जो राजन यांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार...' 'कोल्हापूर डायरीज' मधील गाण्याला अवधूत गुप्तेनी संगीत दिले आहे. स्वप्नील बांदोडकर आणि सायली कांबळे या दोघांनी मिळून हे रोमँटिक गाणे गायले आहे. हे गाणे लवकरच गायत्री दातार आणि भूषण पाटील यांच्यावर चित्रीत होणार आहे. जो राजन म्हणाले, 'सायलीच्या गळ्यात जादू आहे. तिचा इंडियन आयडलचा संगीत प्रवास पाहिला आहे. या महाराष्ट्राच्या लाडक्या मुलीला मराठी सिनेमासाठी ब्रेक देताना मला खूप आनंद होतो आहे.' संगीतकार, गायक, फिल्ममेकर अवधूत गुप्ते म्हणाले,' दिग्दर्शक जो राजन यांनीच मला सायलीचे नाव या गाण्यासाठी सुचवले. ती किती उत्तम गायिका आहे, ते ती दरवेळी सिद्ध करते. सायलीच्या रूपाने एक टॅलेंटेड गायिका मिळाली आहे. '
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3spq7mO