मुंबई टाइम्स टीम सध्या छोट्या पदद्यावर जुन्या मालिकांच्या नव्या पर्वाचं वारं वाहत आहे. नुकत्याच आलेल्या 'साथिया २', 'प्रतिज्ञा २', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी २' या मालिकांप्रमाणे '' आणि 'पवित्रा रिश्ता' यांचे नवे सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. पण ही नवी पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आजच्या ओटीटीच्या जमान्यात मालिकांची नवीन पर्व यशस्वी होण्याचा मार्ग नक्कीच अवघड असेल, असं जाणकार सांगतात. बॉलिवूडवाले गाजलेल्या चित्रपटांचे रिमेक आणि सिक्वेल बनवण्यात व्यग्र आहेत. त्याचप्रमाणे छोट्या पडद्यावरसुद्धा गाजलेल्या मालिकांचे नवे सीझन आणून आधीसारखी लोकप्रियता मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. 'इस प्यार को क्या नाम दू', 'कसोटी जिंदगी की', 'ना आना इस देस लाडो', 'वेहद', 'कवच', 'साथ निभाना साथिया', 'प्रतिज्ञा' यासारख्या अनेक मालिकांचं दुसरं पर्व आलं. पण यातील कोणत्याच मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. आता 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'बडे अच्छे लगते है', '' या मालिकांचे नवे सीझन लवकरच येणार आहेत. त्याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. या मालिकांची शीर्षकं माहीत असल्यामुळे प्रेक्षक लगेचच मालिकेकडे आकर्षित होतील, असा विश्वास निर्मात्यांना आहे. पण टीआरपीच्या शर्यतीत अव्वल राहण्यासाठी मालिकांना 'काटे की टक्कर' द्यावी लागणार आहे. नवे विषय नाहीत का? निर्माते आणि लेखकांकडे नवे विषय नसल्याचा सूर मालिकाविश्वात उमटताना दिसतोय. तसंच निर्माते सावधगिरी बाळगत पूर्वी लोकप्रिय ठरलेला साचा पुन्हा नव्यानं प्रेक्षकांसमोर आणत असल्याचं जाणकार सांगतात. कारण मनोरंजनसृष्टीची विस्कटलेली घडी पुन्हा नीटनेटकी करण्यासाठी अधिकधिक प्रेक्षकवर्ग टीव्हीकडे वळवायचा आहे. '' मालिकेतील अभिनेत्री अविका गौर सांगते की, 'यश-अपयश ही गोष्ट नाकारू शकत नाही. उत्तम काम आणि सादरीकरण करणं आम्हा कलाकारांच्या हातात आहे. गाजलेल्या मालिकेचा सिक्वेल घेऊन येणं ही मोठी जबाबदारी आहे. यासाठी लेखकांना खूप मेहनत घ्यावी लागते'. दुसऱ्या सीझनची जादू कमीअनेक निर्मात्यांनी प्रेक्षकांची जुन्या मालकेची असलेली ओढ लक्षात घेऊन त्याचेच नवे सीझन आणले. पण हे नवीन सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात यशस्वी ठरले नाहीत. 'प्रतिज्ञा' या २००९ साली आलेल्या मालिकेनं तीन वर्षं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण या मालिकेचा यंदा आलेला पुढचा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. परिणामी, मालिका काही भागांनंतर गुंडाळण्यात आली. २००२ साली आलेल्या 'संजीवनी' या मालिकेचं नवं पर्व २०१९ साली आणण्यात आलं. पण तो सीझन प्रेक्षकांना तितकासा आवडला नाही. निर्माती एकता कपूरने 'कसोटी जिंदगी की'चा दुसरा सीझन आणला, पण पार्थ समथान आणि एरिका फर्नांडिस यांची प्रेमकथा प्रेक्षकांना भुरळ पाडण्यास कमी पडली. असंच काहीसं 'बेहद २', 'कवच २', 'लाडो २', 'इस प्यार को क्या नाम दू ३', 'न बोले तुम न मैंने कुछ कहा २', 'पुनर्विवाह २', 'ब्रह्मराक्षस २' या मालिकांच्या बाबतीत घडलं. प्रेक्षक रमलाय आठवणींत मालिकांचं पहिलं पर्व पाहिलं होतं तो प्रेक्षकवर्ग आता चाळीशी, पन्नाशी किंवा साठीत आहे. तर तरुण प्रेक्षक वेब सीरिज व चित्रपटांकडे वळला आहे. त्यामुळे चाळीशी ते साठीत असलेल्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी जुन्या मालिका आणल्या जात असल्याचं जाणकार सांगतात. जेणेकरून जुन्या मालिकांच्या आठवणींमध्ये रमत प्रेक्षक पुन्हा टीव्हीकडे वळतील. त्यासह ओटीटीकडे वळलेल्या प्रेक्षकांसाठी जुन्या मालिकांचे नवीन पर्व त्या माध्यमावर आणले जात आहेत. संकलन- उपमा सिंह, रामेश्वर जगदाळे
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3CFWphY