Full Width(True/False)

सॅमसंगचा आणखी एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच, पाहा फोनची खास फीचर्स

नवी दिल्लीः Samsung ने आपल्या स्मार्टफोन्सची रेंज वाढवत गॅलेक्सी ए सीरीज अंतर्गत नवीन हँडसेट ला लाँच केले आहे. फीचर्स मध्ये हा स्मार्टफोन बऱ्याच अंशी गॅलेक्सी A12 सारखाच आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे प्रोसेसरचा आहे. कंपनीने या फोनला आता रशियात लाँच केले आहे. फोनला ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेज आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज मध्ये आणले आहे. रशियात ३ जीबी रॅमच्या फोनची किंमत RUB 11990 जवळपास १२ हजार १०० रुपये आहे. तर याच्या ४ जीबी रॅमच्या व्हेरियंटची किंमत RUB 13,990 जवळपास १४ हजार १०० रुपये आहे. वाचाः गॅलेक्सी A12 नाचोचे फीचर फोनमध्ये 720x1600 पिक्सल रेजॉलूशनसोबत ६.५ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो २०.९ आणि रिफ्रेश रेट 60Hz दिला आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये कंपनीने स्वतः डेव्हलप केलेले Exynos 850 चिपसेट दिले आहे. युजर्संना मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत स्टोरेज वाढवता येवू शकते. वाचाः साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबत या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅश सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, एक २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. जी १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jz7oBn