Full Width(True/False)

दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे यांची होती अनोखी मैत्री

मुंबई- मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारे प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. आज दादा आपल्यात नसले तरी लोकांच्या हृदयात ते जिवंत आहेत. दादा कोंडके हे असे अभिनेते होते जे आपल्या सिनेमांच्या नावांनी सेन्सॉर बोर्डाच्या डोळ्यात पाणी आणायचे. सामान्य माणसाचा नायक अशी त्यांची खास ओळख होती. विशेष म्हणजे त्यांचे सलग नऊ सिनेमे होते जे चित्रपटगृहांमध्ये २५ आठवड्यांहून अधिक चालले होते. एवढेच नाही तर गिनीज बुकमध्ये त्यांच्या नावाने रेकॉर्डही आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की दादा कोंडके यांचे खरे नाव कृष्णा कोंडके होते. त्यांचं बालपण लहान मोठ्या मारामाऱ्या करण्यात गेलं. दादांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की ते मारामारीत विटा, दगड, बाटल्या यांचा वापर करायचे. दादा कोंडके यांनी राजकारणात आपले स्थान निर्माण केले होते. ते शिवसेनेशी संबंधित होते आणि शिवसेनेच्या रॅलींमध्ये गर्दी जमवायचे. प्रचारसभेत विरोधी पक्षातील राजकारण्यांवर आपल्या अनोख्या शैलीत प्रहार करणं ही त्यांची खासियत होती. दादा कोंडके यांचं 'विच्छा माझी पुरी करा' हे नाटक तुफान गाजलं होतं. खरे तर हे नाटक काँग्रेसविरोधी मानले जाते, कारण या नाटकात इंदिरा गांधींची थट्टा उडवण्यात आली होती. दादांनी या नाटकाचे १ हजार १०० हून जास्त प्रयोग केले होते. या आकड्यावरूनच अंदाज येतो की हे नाटक तेव्हा किती गाजलं असेल. १९७५ साली दादा कोंडके यांचा 'पांडू हवालदार' हा सिनेमा आला जो खूप लोकप्रिय झाला. त्यांनी या सिनेमांत मुख्य भूमिका साकारली होती. हा सिनेमा एवढा प्रसिद्ध झाला होता की यानंतर हवालदारांना पांडू नावाने हाक मारली जाऊ लागली. दादा कोंडके विनोदी कलाकार होते आणि आपल्या संवादात ते बहुतांशवेळा डबल मिनिंगचा वापर करायचे. त्यांच्या याच शैलीमुळे ते लोकप्रसिद्ध झाले होते. दादा कोंडके यांच्या सात मराठी सिनेमांनी सुवर्ण महोत्सव साजरा केला आणि तेव्हापासून त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. १४ मार्च १९९८ रोजी दादा कोंडके यांचे निधन झाले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ApZm4j