मुंबई: टीव्ही रिअलिटी शो 'खतरों के खिलाडी' सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. एकीकडे सर्व स्पर्धक उत्तम परफॉर्मन्स देत असताना दुसरीकडे मात्र फारच निराशाजनक कामगिरी करताना दिसत आहे. निक्कीनं पुन्हा एकदा नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये टास्क अर्धवट सोडत चाहत्यांची निराशा तर केलीच पण यासोबतच तिने तिच्या टीममधील सहकाऱ्यांनाही अडचणीत आणलं आहे. ज्यामुळे आता होस्ट तिच्यावर चिडला आहे. निक्कीच्या अशाप्रकारे टास्क अर्धवट सोडण्यामुळे राहुल वैद्य, वरुण सूद, विशाल आदित्य सिंह, महक चहल, अर्जुन बिजलानी यांनाही फटका बसणार आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये स्पर्धकांना बेड्यांनी बांधून ठेवण्यात आलं होतं आणि टास्कच्या जागी ठेवण्यात आलेल्या बॉक्समधून त्यांना चावी काढून एक एक बेड्यांतून स्वतःला सोडवायचं होतं. पण या बॉक्समध्ये वेगवेगळे प्राणी होते. हा एक ग्रुप टास्क होता. सर्वात आधी निक्कीनं चिकन मांस असलेल्या बॉक्समधून चावी काढण्याचा प्रयत्न केला. पण फोबियामुळे ती हा टास्क पूर्ण करू शकली नाही आणि तिनं हा टास्क अबॉर्ट करण्याचा निर्णय घेतला. या वेळी तिचे सहकारी राहुल वैद्य आणि विशाल आदित्य सिंह यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण निक्कीनं त्यांचं ऐकलं नाही. निक्कीनं हा टास्क अबॉर्ट करत संपूर्ण टीमचा रोष ओढावून घेतला आहे. आपल्या निराशाजनक प्रदर्शनावर स्पष्टीकरण देताना निक्की म्हणाली, 'मी स्वतःला पॅनिक करू शकत नाही. कोणच्याही सांगण्यावरून मी हे करू शकत नाही. निक्कीच्या प्रयत्न न करताच टास्क अबॉर्ट करण्यावर अर्जुन बिजलानी, राहुल वैद्य, वरुण सूद यांनी नाराजी व्यक्त केली. जेव्हा निक्की या खेळातून बाहेर पडली तेव्हा रोहित शेट्टी म्हणाला, 'तुमची टीम हा टास्क हारली आहे पण मला निक्कीशी बोलायचं आहे.' यानंतर रोहित शेट्टीनं यावर राहुल वैद्यला त्याचं मत विचारलं. राहुल म्हणाला, 'ज्याप्रकारे निक्की वचन देऊन परत आली होती त्याप्रमाणे ती आपलं वचन पूर्ण करू शकलेली नाही.' राहुलच्या प्रतिक्रियेवर निक्की म्हणाली, 'सर मी परत आहे तर होते असं म्हणत की, मी प्रत्येक टास्क पूर्ण करेन पण मला आता याची जाणीव झाली आहे की हे सर्व प्राणी माझी कमजोरी आहे.' निक्कीच्या या बोलण्यावर रोहित शेट्टी भडकला. तो म्हणाला, 'जर पुढे असेच प्राणी टास्कमध्ये असतील तर तू काय करशील आणि असे स्टंट्स तर येतच राहणार आहेत.' रोहित शेट्टी पुढे म्हणाला, 'लोक इथे एन्जॉय करण्यासाठी येत नाहीत तर स्टंट्स करण्यासाठी येतात. आणि तुला तुझी क्षमता किती आहे याची जाणीवच नाहीये. अनेकदा आपल्याला काही गोष्टी जबाबदारी म्हणून कराव्या लागतात. यावेळी तुझ्यावर पाच लोकांची जबाबदारी होती. इथे एक मुलगी स्टंट करत आहे पण तुला दुसरी संधी मिळून त्यात काही करून दाखवता आलं नाही. तू या शोचा आणि माझा अपमान केला आहेस. ऑफ स्क्रिनबद्दल बोलायचं तर सौरभ राज जैनची पात्रता तुझ्यापेक्षा जास्त होती.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37uwuvE