नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी ने आपल्या दोन प्रीपेड प्लान्समध्ये मिळणाऱ्या फायद्यात मोठा बदल केला आहे. हा बदल सर्व टेलिकॉम सर्कल्सच्या BSNL ग्राहकांसाठी करण्यात आला आहे. बीएसएनएलने आपल्या प्रीपेड प्लानमध्ये बदल केला आहे. त्यात १९९९ रुपये आणि २३९९ रुपयांचा प्लान आहे. बीएसएनएलचे हे दोन्ही प्लान वार्षिक प्लान आहेत. कंपनीने आपल्या प्लानची वैधता आणि मिळणाऱ्या फ्री बेनिफिट्स मध्ये बदल केले आहेत. हे केरळ टेलिकॉमटॉकच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. वाचा: प्लान सोबत आता मिळेल ४२५ दिवसाची वैधता BSNL ने आपल्या २३९९ रुपयांच्या वार्षिक प्रीपेड प्लानची वैधता ६० दिवस आणखी वाढवले आहे. म्हणजेच या प्लानवर आता एकूण ४२५ दिवसांची वैधता मिळेल. आधी या प्लानवर ३६५ दिवसाची वैधता मिळत होती. ही ऑफर नोव्हेंबर २०२१ पर्यंत आहे. बीएसएनएलच्या या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळत आहे. दिवसभरात ३ जीबी डेटा संपल्यानंतर 80Kbpsच्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळतो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये ४२५ दिवसासाठी अनलिमिटेड साँग चेंज ऑप्शन सोबत फ्री BSNL ट्यून्स मिळते. सोबत ४२५ दिवसासाठी EROS Now चे कंटेट मिळते. वाचा: १९९९ रुपयांच्या प्लानमध्ये आता ६०० जीबी रेग्युलर डेटा BSNL ने आपल्या १९९९ रुपयाच्या वार्षिक प्रीपेड प्लानमध्ये बदल केला आहे. या प्लानची वैधता ३६५ दिवसाची आहे. प्लानमध्ये आधी ५०० जीबी रेग्युलर डेटा आणि १०० जीबी एक्स्ट्रा प्रमोशनल ऑफर अंतर्गत मिळत होता. आता या प्लानमध्ये ६०० जीबी रेग्युलर डेटा मिळतो. हाय स्पीड डेटा संपल्यानंतर 80Kbps ची स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळतो. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. सोबत रोज 100SMS पाठवण्याची सुविधा मिळते. प्लानमध्ये ६० दिवसांची लोकधुन कंटेंट आमि ३६५ दिवसासाठी EROS Now इंटरटेनमेंट सर्विसचा फायदा मिळतो. वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3z50VVl