नवी दिल्ली : स्वदेशी हँडसेट निर्माता Micromax लवकरच आपल्या लोकप्रिय सीरीज अंतर्गत नवीन मोबाईल लाँच करणार आहे. कंपनीने अलीकडेच आपला Micromax In 2 b स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला होता जो एक एंट्री लेव्हल फोन आहे आणि आता गीकबेंच वर अलीकडेच एक नवीन डिव्हाइस स्पॉट झाले आहे. या आगामी मायक्रोमॅक्स मोबाईल फोनचे नाव असे आहे. गीकबेंच लिस्टमधून फोनची काही प्रमुख फीचर्सबद्धल माहिती समोर आली आहे. जाणून घ्या सविस्तर. वाचा: गीकबेंच लिस्टिंगमध्ये असे दिसून आले आहे की, आगामी मायक्रोमॅक्स स्मार्टफोन Micromax In Note 1 Pro म्हणून ओळखला जाईल आणि त्याचा मॉडेल क्रमांक E7748 आहे. विशेष म्हणजे, याच मॉडेलने यापूर्वीच बीआयएस भारतीय प्रमाणपत्र मागील वर्षी मिळविले आहे. Micromax In Note 1 Pro स्पेसिफिकेशन्स सॉफ्टवेअर: गीकबेंच लिस्टिंगनुसार, फोन अँड्रॉइड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. प्रोसेसर: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक MT6785 प्रोसेसर आहे, हा चिपसेट इतर इतर दुसरा कुठला नसून ४ जीबी रॅमसह हेलियो जी ९० प्रोसेसर आहे. डिस्प्ले, कॅमेरा आणि बॅटरीच्या क्षमतेशी संबंधित तपशील अद्याप समोर आला नाही . या मायक्रोमॅक्स मोबाईलने सिंगल कोर आणि मल्टी कोर टेस्टमध्ये अनुक्रमे ५१९ आणि १६७३ गुण मिळवले आहेत. या व्यतिरिक्त, गीकबेंच लिस्टमधून सध्या तरी इतर कोणतीही माहिती उघड झालेली नाही. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k9Q0mX