नवी दिल्लीः जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल आपल्या युजर्संसाठी जबरदस्त प्लान ऑफर करीत आहे. या यादीत आता आम्ही तुम्हाला बीएसएनएलचा असा एक प्लान सांगणार आहोत. ज्यात युजर्संना १ जीबी डेटा साठी २ रुपयांपेक्षा कमी किंमत लागते. तर रिलायन्स जिओ आणि एअरटेल सारखे अन्य ऑपरेटर यापेक्षा जास्त महाग प्लान देतात. त्यामुळेच बीएसएनएलचा हा प्लान सर्वात स्वस्त प्लान बनला आहे. हा एक स्टँडअलोन डेटा व्हाउचर नाही आहे. ज्याला १.४२ रुपयात खरेदी जावू शकते. यासाठी तुम्हाला १ जीबी डेटा मिळेल. जाणून घ्या या प्लान संबंधी. वाचाः च्या या प्लान सोबत मिळतो १.४२ रुपयात 1GB डेटा बीएसएनएल युजर्संना ५९९ रुपयांच्या प्रीपेड प्लान सोबत सर्वात स्वस्त डेटा मिळतो. या प्लानचे नाव 'STV_WFH_599' आहे. हा ५९९ रुपयात येतो. युजर्संना यात ८४ दिवसांची वैधता मिळते. या प्लान सोबत युजर्संना अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळते. सोबत ५ जीबी डेली डेटा मिळतो. याचाच अर्थ या प्लानमध्ये युजर्संना एकूण डेटा २४० जीबी डेटा मिळतो. अन्य कोणतीही कंपनी युजर्संना ८४ दिवसांसाठी प्रीपेड प्लानमध्ये इतका डेटा देत नाही. युजर्संना प्रत्येक जीबी डेटाचा वापर करण्यासाठी फक्त १.४२ रुपये लागते. तसेच युजर्संना Zing चे फ्री बेनिफिट मिळते. वाचाः जास्त डेटासाठी करू शकता प्लानमधून रिचार्ज तुमच्यासाठी हा डेटा जर कमी वाटत असेल तर कंपनी २५१ रुपयात अॅड ऑन डेटा व्हाउचर खरेदी करू शकता. या व्हाउचरचे नाव 'DATA_WFH_251' आहे. युजर्संना २८ दिवसांसाठी जिंगचे फ्री मेंबरशीप सोबत ७० जीबी डेटा देते. हा डेटा अॅड ऑन प्लान सोबत युजर्संना ३.५८ रुपयात ३ जीबी डेटा मिळतो. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VKALIX