नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल () ने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लान्स लाँच (Prepiad Plans Launch) केले आहेत. भारती एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओ सह सर्व दूरसंचार ऑपरेटर्सला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल आपल्या प्रीपेड प्लानला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल आपल्या प्रीपेड प्लान्सची रेंज मध्ये विस्तार करीत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने पंजाब क्षेत्रासाठी नवीन प्रीपेड प्लान लाँच केले होते. आता बीएसएनएल राजस्थान सर्कलसाठी ग्राहकांसाठी नवीन प्लान्स लाँच केले आहे. हे प्लान बीएसएनएलसाठी इनअॅक्टिव ग्राहकांसाठी आहे. वाचाः BSNL च्या २०१ रुपयाचा प्रीपेड प्लानचे फायदे नवीन बीएसएनएल राजस्थान प्रीपेड प्लानच्या लिस्ट मध्ये प्लान २०१ रुपयाचा आहे. हा प्लान फक्त जीपी II आणि जीपी II साठी लागू आहे. त्यामुळे रिचार्ज करण्यासाठी आधी हे निश्चित करायला हवे की, तुम्ही या गटातील ग्राहक आहात की नाही. बीएसएनएलचा २०१ रुपयांचा प्रीपेड प्लान ९० दिवसांच्या वैधतेसोबत येतो. ९० दिवसाच्या पूर्ण वैधतेत सब्सक्राबर्सला ६ जीबी डेटाचा फायदा मिळतो. यासोबतच त्यांना ३०० मिनिट लोकल किंवा STD कॉलिंगसाठी दिले जाते. वाचाः BSNL ने लाँच केले १८७ रुपये आणि १४९९ रुपयांचे प्लान २०१ रुपयाच्या प्लान सोबत बीएसएनएलने १८७ रुपयांचा एसटीव्ही प्लान आणला आहे. जो सध्या १३९ रुपयांत उपलब्ध आहे. म्हणजेच बीएसएनएलच्या या प्रीपेड प्लानवर ग्राहकांना ४८ रुपयांचा डिस्काउंट मिळेल. या प्लानच्या फायद्यात ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा दिला जातो. याची वैधता २८ दिवसांपर्यंत आहे. यासोबतच सब्सक्रायबर्सला रोज १०० एसएमएसचा लाभ मिळतो. बीएसएनएलने तिसरा प्लान लाँच केला आहे. तो १४९९ रुपयांचा आहे. हा एसटीव्ही ११९९ रुपयाच्या सूटवर उपलब्ध आहे. याची पूर्ण वैधतेत २४ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. ग्राहकांना यात रोज १०० एसएमएस दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lADzms