Full Width(True/False)

Disney+ Hotstar OTT ने सादर केले तीन नवीन प्लान्स, सुरुवाती किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी

नवी दिल्ली : Disney+ Hotstar प्लेटफॉर्मने भारतीय ग्राहकांसाठी तीन नवीन प्लान्स आणले आहेत. हे प्लान्स १ सप्टेंबरपासून उपलब्ध होतील. यामुळे सबस्क्रिप्शन घेतलेल्या ग्राहकांना स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर आपल्या आवडत्या आणि चित्रपटांचा आनंद घेता येईल. भारतात सध्या डिज्नी+ हॉटस्टारचे ४९९ रुपयांपासून सुरू होऊन १४९९ रुपयांपर्यंत जातात. वाचाः कंपनीने आता भारतीय ग्राहकांसाठी तीन नवीन प्लान्स आणले आहेत. यात २९९ रुपयांचा मासिक, ३९९ रुपयांचा वीआयपी आणि १९९ रुपयांचा वार्षिक प्लान आहे. Disney+ Hotstar चा ४९९ रुपयांचा प्लान ४९९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला एचडी क्वालिटीमध्ये वर्षभरासाठी व्हिडीओ अ‍ॅक्सेस मिळतो. हा प्लान केवळ मोबाइल यूजर्ससाठीच आहे. त्यामुळे तुम्हाला केवळ फोनमध्ये कॉन्टेंट पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर हा प्लान चांगला आहे. Disney+ Hotstar चा ८९९ रुपयांचा प्लान ८९९ रुपयांच्या सबस्क्रिप्शन प्लानमध्ये यूजर्सला एचडी क्वालिटीमध्ये दोन डिव्हाइस/स्क्रीनवर वर्षभरासाठी व्हिडीओ अ‍ॅक्सेस करता येतो. वर्षभरासाठी येणारा हा प्लान लॅपटॉप, टीव्ही आणि स्मार्टफोन यूजर्ससाठीच आहे. Disney+ Hotstar चा १४९९ रुपयांचा प्लान Disney+ Hotstar च्या १४९९ रुपयांच्या सबस्क्रिप्शन प्लानमध्ये यूजर्स ४के क्वालिटीमध्ये चार डिव्हाइस/स्क्रीनवर वर्षभरासाठी व्हिडीओ अ‍ॅक्सेस करू शकता. हा प्लान लॅपटॉप, टीव्ही आणि स्मार्टफोन यूजर्ससाठी आहे. हा वर्षभरासाठी असलेला सर्वात प्रीमियम प्लान आहे. नवीन Disney+ Hotstar सब्सक्रिप्शन प्लान कसे घ्याल ? नवीन Disney+ Hotstar सब्सक्रिप्शन प्लान १ सप्टेंबर २०२१ पासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. तुम्हाला जर या प्लान्सचे सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल तर Disney+ Hotstar च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3scWLYI