नवी दिल्लीः टेलिकॉम मार्केट मध्ये Airtel, Vi, BSNL ला जोरदार टक्कर देण्यासाठी ने अनेक प्लान्स ऑफर केले आहेत. कंपनी कमी किंमतीत जबरदस्त बेनिफिट्स प्लान उपलब्ध करीत आहे. जिओच्या पोर्टफोलियत युजर्संना कमी किंमतीत डेली डेटा आणि कॉलिंगची सुविधा दिली जाते. जिओचा ३९ रुपयाचा प्लान आहे. जिओच्या या प्लानमध्ये युजर्संना डेली डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सारखे बेनिफिट देत आहे. जाणून घ्या जिओच्या स्वस्त रिचार्ज प्लानसंबंधी. वाचाः जिओचा ३९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये युजर्संना रोज १०० एमबी डेटा दिला जातो. याची वैधता १ दिवसाची आहे. पूर्ण वैधते दरम्यान युजर्संना 1400MB डेटा उपलब्ध केला जातो. याशिवाय, युजर्संना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. जिओच्या या प्लानमध्ये डेली फ्री SMS सुविधा दिली जात नाही. जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. सर्वात खास बाब म्हणजे जिओचा हा स्वस्त रिचार्ज प्लान Jio Phone यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आला आहे. वाचाः अन्य कंपन्यांचे स्वस्त प्लान जिओच्या किंमतीच्या जवळपास एअरटेलचा ४९ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. यात ३८.५२ रुपयाचा टॉकटाइम, 100MB डेटा आणि २८ दिवसांची वैधता दिली जाते. तर एक १९ रुपयाचा प्लान सुद्धा आहे. याची वैधता २ दिवसाची आहे. यात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. सोबत 200MB चा डेटा दिला जातो. वाचाः Vi चा ४९ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. यात ३८ रुपयांचा टॉकटाइम, 100MB ड़ेटा आणि २८ दिवसांची वैधता दिली जाते. अॅपवरून रिचार्ज केल्यास 200MB डेटा अतिरिक्त दिला जातो. BSNLचा ४९ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. याची वैधता २४ दिवसाची आहे. यात १०० मिनिट्स व्हाइस कॉलिंग दिली जाते. २ जीबी डेटा आणि १०० SMS दिले जाते. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jLWXKS