नवी दिल्ली : नामांकित हँडसेट निर्माता Xiaomi ने ग्राहकांसाठी आपला पहिला अंडर-डिस्प्ले कॅमेराने सुसज्ज असा मजबूत स्मार्टफोन बाजारात दाखल असून हा नवीन फोन नवीन कॅमेरा तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे जो डिस्प्लेच्या आत फ्रंट कॅमेरा पॅक करतो. कंपनीने याला कॅमेरा अंडर पॅनेल असे नाव दिले आहे. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, या Mi Mix 4 मध्ये कंपनीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि स्टिरिओ स्पीकर्स दिले आहेत. वाचा: Mi Mix 4 फीचर्स : Mi Mix 4 डिस्प्ले: फोनमध्ये ६.६७ इंच फुल-एचडी + (१०८०x२४०० पिक्सेल) १० बिट ट्रूकोलर AMOLED स्क्रीन आहे. फोनचा आस्पेक्ट रेशियो २० : ९आहे आणि रिफ्रेश रेट १२० Hz आहे. एवढेच नाही तर, फोनमध्ये डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ सपोर्ट फोनमध्ये उपलब्ध असेल. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचा वापर संरक्षणासाठी केला गेला आहे. Mi Mix 4 प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज: फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८+ प्रोसेसर १२ जीबी एलपीडीडीआर ५५ रॅमसह स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी ५१२१ जीबी (यूएफएस ३.१) स्टोरेज आहे. Mi Mix 4 कॅमेरा: फोनमध्ये तीन मागील कॅमेरे, ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्टसह १०८ मेगापिक्सलचा प्राथमिक HMX कॅमेरा, ५० x झूम सपोर्टसह १३ मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे, जो कॅमेरा अंडर पॅनल (CUP) तंत्रज्ञानासह येईल, ज्याची पिक्सेल घनता ४०० पिक्सेल प्रति इंच आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, Wi-Fi 6, 4G LTE, GPS, A-GPS, Bluetooth आणि USB Type-C पोर्ट समाविष्ट आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश आहे. Mi Mix 4 बॅटरी: शाओमीच्या या शक्तिशाली फोनमध्ये ४५०० mAh ची बॅटरी आहे. जी, १२० W पर्यंत वायर्ड चार्जिंग आणि ५०W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. Mi Mix 4 किंमत फोनचे सिरेमिक व्हाईट, सिरेमिक ब्लॅक आणि सर्व नवीन सिरेमिक ग्रे व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. Mi Mix 4 च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY ४९९९ (अंदाजे ५७,४०० रुपये) आहे, तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY ५,२९९ (अंदाजे ६०,८०० रुपये) आहे. त्याचबरोबर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY ५७९९ (सुमारे ६६,६०० रुपये) आहे. १२ जीबी रॅमसह ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY ६२९९ (अंदाजे ७२,३०० रुपये) आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jMRTFM