Full Width(True/False)

आता कधीही पार्टी करा, boAt ने लाँच केला स्वस्तातील ब्लूटूथ स्पीकर

नवी दिल्लीः भारतात स्मार्ट होम डिव्हाइस मार्केटमध्ये पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर्स () मध्ये सर्वात जास्त स्पर्धा पाहायला मिळत आहे. भारतात पॉकेट फ्रेंडली ब्लूटूथ स्पीकर कंपन्यांनी लाँच केले आहेत. पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर्सच्या लिस्टमध्ये फक्त जेबीएल क्लिप ३, जेबीएल गो २, सोनी एसआरएस एक्सबी १३, एलजी पीएच २, सारखे जेबीएल, सोनी आणि एलजी सारख्या डिव्हाइसचा समावेश आहे. तसेच Mivi, आणि Zebronics आणि pTron पर्यंत सारख्या कंपन्यांचे पोर्टेबल स्पीकरचा समावेश आहे. आता या यादीत boAt ने आणखी एक स्पीकर लाँच केले आहे. भारतीय ऑडियो ब्रांड boAt ने भारतात एक नवीन पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर लाँच केले आहे. boAt च्या या स्पीकरचे नाव boAt Stone 1200 ठेवले आहे. याला कंपनीने स्वस्त किंमतीत लाँच केले आहे. boAt Stone 1200 ची किंमत नवीन लाँच करण्यात आलेल्या boAt Stone 1200 पोर्टेबल स्पीकरला भारतात ३ हजार २९९ रुपयाच्या किंमतीत लाँच केले आहे. या स्पीकरला ग्राहक Amazon India, boAt-lifestyle.com आणि रिटेल स्टोर्सवरून खरेदी करू शकता. या स्पीकरला मरून, ब्लॅक आणि ब्लू तीन रंगात आणले आहे. boAt Stone 1200 चे स्पेसिफिकेशन्स boAt Stone 1200 पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरमध्ये खालच्या स्टँडसोबत ३६० डिग्री बेलनाकार डिझाइन आहे. स्पीकरच्या वरच्या बाजुला एक गोलाकार मॉड्यूल आहे. ज्यात सर्व कंट्रोल बटन दिले आहे. या स्पीकर मध्ये व्हॅल्यूमला कंट्रोल करण्यासाठी दोन बटन दिले आहे. एक स्मार्ट हेल्प बटन, संगीतसाठी एक बटन दिले आहे. boAt Stone 1200 पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर मध्ये दोन 76mm फुल-रेंज डायनेमिक ड्राइवर दिले आहे. हे IPX7 धूळ आणि पाण्याने खराब होत नाही. यात कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ व्हर्जन ५.० आहे. १० मीटरच्या आत काम करतो. यात कनेक्टिविटीसाठी टाइप सी पोर्ट आणि एफएम दिले आहे. BoAt Stone 1200 पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर 3,600mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी ९ तासांपर्यंत प्लेबॅक असल्याचा कंपनीचा दावा आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BzGPn0